Hyundai Verna 2023 : मारुती सुझुकी कंपनीनंतर सर्वाधिक कार खप असणारी कंपनी म्हणजे ह्युंदाई आहे. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात ह्युंदाई कंपनीने चांगला जम बसवला आहे. ह्युंदाई कंपनीच्या कारला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
ह्युंदाई कंपनी अनेक नवनवीन मॉडेल बाजारात लॉन्च करत आहे. या नवीन मॉडेल कारमध्ये ग्राहकांना अनेक नवीन आणि धमाकेदार फीचर्स देण्यात येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना अधिक नवीन फीचर्सचा आनंद घेता येत आहे.
ह्युंदाई कंपनीची सर्वाधिक लोकप्रय कार Verna लवकरच नवीन रूपात मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. कंपनीकडून स्टायलिश लूकसह ही कार बाजारात लॉन्च केली जाणार आहे. ग्राहक या कारची प्रतीक्षा करत होते मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे. २१ मार्चला ही कार लॉन्च होणार आहे.
ह्युंदाई कंपनीकडून नवीन रूपात Verna कार बाजारात २१ मार्चला लॉन्च केली जाणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी या कारच्या डिटेल्स आणि डिझाईन समोर आले आहे.
Hyundai Verna इंटीरियर
नवीन Verna कारच्या आतील डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये मोठ्या टचस्क्रीनसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आढळू शकतो. तसेच, यात सनरूफ, ड्युअल पॉवर सीट्स, क्लायमेट कंट्रोल आणि एडीएएस लेव्हल 2 वैशिष्ट्यांसह सध्याच्या मॉडेलपेक्षा खूप जास्त वैशिष्ट्ये दिली जातील.
डिझाइन
नवीन Verna कारला विस्तीर्ण DRLs आणि एक लोखंडी जाळी मिळेल जी संपूर्ण पुढच्या बाजूला पूर्णपणे कव्हर करेल. या कारच्या तळाशी हेडलॅम्प दिले आहेत. कारच्या फ्रंट बंपरला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे.
कारला मोठ्या अलॉय व्हील्स दिल्या जाणार आहेत. तसेच, यात साइड प्रोफाईलसारखे स्लोपिंग कूप आहे. याच्या मागील प्रोफाइलमध्ये पुढीलप्रमाणे पूर्ण आकाराचा लाइट बार आहे, ज्यामुळे त्याची रचना खूपच आकर्षक दिसते.
इंजिन
ह्युंदाई कंपनीकडून २०२३ मधील Verna चे नवीन मॉडेल 4 इंजिन पर्यायांसह लॉन्च करण्यात येणार आहे. एक नवीन 1.5-लीटर टर्बो GDI पेट्रोल इंजिन देखील असेल, जे सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन तसेच 7-स्पीड डीसीटीशी जोडले जाईल. याशिवाय कारमध्ये 1.5 लीटर MPi पेट्रोल इंजिन देखील देण्यात येणार आहे.
ह्युंदाई व्हर्ना पॉवरट्रेन
नवीन वेर्नामध्ये नवीन टर्बो पेट्रोल इंजिनसह दोन पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला जाणार आहे. टर्बो पेट्रोल युनिट 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायासह दिले जाणार आहे.
त्याच्या 1.5L मानक पेट्रोल युनिटला CVT ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय मिळेल. नवीन वेर्नाची किंमत खूपच आक्रमक असू शकते. याबाबतची इतर माहिती लॉन्चिंगच्या वेळीच समोर येईल.