Sharad Pawar : शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली! भाजपच्या माजी मंत्र्यांचा कशी फोडली तेच सांगितले..

Published on -

Sharad Pawar : भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचे काम केले, संजय राऊतांनी यावरही बोलावे, असेही ते म्हणाले.

संजय राऊत सकाळ, दुपार, संध्याकाळ फडफड करत असतात. त्यांनी शिवसेनेला पहिल्यांदा कोणी फोडण्याचा प्रयत्न केला आणि कोणी शिवसेना फोडली यावरही बोलावे. या राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचे काम केले. मात्र संजय राऊत यावर बोलत नाहीत.

आज शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीत आहेत. छगन भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. यावर संजय राऊतांनी बोलावे, असेही ते म्हणाले. अमित शाह हे राष्ट्रीय नेते आहेत, ते गृहमंत्री आहेत. ते राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणे हे चुकीचे आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील संजय राऊत हे शकुनी मामा आहेत. ते शिवसेनेत राहून शरद पवारांचे काम करत आहेत. त्यामुळे शिवसेनेची दुर्दशा झाली आहे. यातून त्यांच्या बौद्धिक क्षमतेची लक्तरे उडाले आहेत.

त्यांनी दिवसातून तीनवेळा बोलून शिवसेनेचा कार्यक्रम केला आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राची जनता पाहत आहे. त्यामुळे राऊत काय म्हणतात हे भाजपाने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, असेही राम शिंदे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe