Uddhav Thackeray : ‘हे भवानीमाते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही’

Published on -

Uddhav Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत. सरकार गेल्यानंतर आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील त्यांना गमवावे लागले आहे. असे असताना आपल्या नेत्याला अडचणीत बघून कल्याणमधील एका महिला कार्यकर्त्याने देवीच्या चरणी अनोखी प्रतिज्ञा केली आहे.

यामध्ये जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ आशा रसाळ यांनी घेतली आहे. यामुळे सध्या याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये देवीच्या चरणी आशा रसाळ यांनी साकड घातल आहे.

यावेळी अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. त्यांनी पूजाऱ्यांच्या साक्षीने दुर्गाडी किल्ल्यावर शपथ घेतली. देवीला साकड घातले. आज महाराष्ट्रावर संकट आल आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर संकट आहे.

शिवसैनिक म्हणून छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून आज मी अशी शपथ घेते की, जोपर्यंत उद्धव साहेब पुन्हा सन्मानाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी अनवाणी राहीन. चप्पल घालणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच उपस्थित भाविकांनी भवानी मातेचा तसेच उद्धव ठाकरे यांचा जयजयकार केला. उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आज असत्याचा विजय होतो असं दिसतंय. परंतु देवाच्या समोर सगळे सारखेच असतात. म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरातील दुर्गाडी किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्थापना केलेल्या जगदंबा मातेच्या चरणी आलो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News