Jyotish Tips : सावधान! चुकूनही करू नका हे काम, अन्यथा भिकाऱ्यासारखे दारोदारी भटकावे लागेल…

Published on -

Jyotish Tips : जीवन जगात असताना प्रत्येकाकडून अनेक चुका होत असतात मात्र काही चुका अशा घडून जातात की त्या चुका तुमच्याही लक्षात येत नाहीत. मात्र अशा चुकांचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. अनेकवेळा देवाची पूजा करताना काही चुका घडतात आणि याच चुका घरी दारिद्र्य आणतात.

ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यातील चुका तुम्हीही करत असाल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा तुमच्या पाठीमागेही दारिद्र्याची पिडा लागेल आणि तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होईल.

ज्योतिषांच्या मते हे काम कधीही करू नका

भगवान शिव आणि गणपतीला कधीही तुळशीची पाने अर्पण करू नका.

माँ भगवतीला कधीही दुर्वा अर्पण करू नये. यासोबतच त्यांना अशुभ वस्तू अर्पण करू नयेत.

भगवान शंकराला रोळी किंवा शिंदूर लावू नये. त्यांना पांढर्‍या चंदनाचा तिलक लावावा.

घरात कधीही पवित्र शिवलिंग ठेवू नका. असे शिवलिंग जागृत मानले जाते आणि त्याचे दुष्परिणाम घरावर पडतात.

घरात कधीही गणपतीच्या तीन मूर्ती ठेवू नयेत. घरात जास्तीत जास्त दोनच मूर्ती ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक मूर्ती मुख्य दरवाजाच्या वर ठेवली जाते आणि दुसरी घराच्या पूजेच्या ठिकाणी ठेवली जाते.

घरात चुकूनही दुसरा दिवा लावू नये. असे करणे अशुभ आहे.

तुटलेल्या मूर्तीची कधीही पूजा करू नये. अशा मूर्तींचे नदी, समुद्र किंवा पवित्र ठिकाणी विसर्जन करावे.

भगवान विष्णूला फक्त पिवळ्या चंदनाचा तिलक लावावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News