Fertilizers New Rate : शेतकऱ्यांना दिलासा! खतांच्या दरात मोठा बदल, पहा आजचे नवीनतम दर…

Published on -

Fertilizers New Rate : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दिवसेंदिवस अनेक नवनवीन योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना रासायनिक खते स्वस्त दरात मिळवी यासाठी केंद्र सरकारकडून 60,939 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.

युरियाची किंमत केंद्र सरकारने निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफक दरात सध्या युरिया मिळत आहे. मात्र काही ठिकाणी खतांचा काळाबाजार सुरु आहे. खतांचा पुरवठा योग्य होत नसल्याने शेतकऱ्यांना जास्तीच्या दराने खाते विकली जात आहेत.

शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जागरूक बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून खतांच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जाहीर झालेल्या खतांच्या किमतीमध्ये शेतकरी खते खरेदी करू शकतात.

भारतीय कंपनी IFFCO ने खतांच्या किमती जाहीर केल्या आहेत. त्यात केंद्र सरकारकडून अनुदानासह ज्या किमतीमध्ये खते उपलब्ध आहेत ते दर खालील प्रमाणे

अनुदानासह खतांच्या किमती

यूरिया – 266.50 रुपये प्रति बॅग (45 किलो)

डीएपी – 1,350 रुपये प्रति बॅग (50 किलो)

NPK – 1,470 रुपये प्रति बॅग (50 किलो)

एमओपी – 1,700 रुपये प्रति बॅग (50 किलो)

अनुदानाशिवाय खतांच्या किमती

युरिया – 2,450 रुपये प्रति बॅग (45 किलो)

NPK – 3,291 रुपये प्रति बॅग (50 किलो)

एमओपी – 2,654 रुपये प्रति गोणी (50 किलो)

डीएपी – 4,073 रुपये प्रति बॅग (50 किलो)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News