7th Pay Commission : आता लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना सध्या 38 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. जर आता केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ वाढ केली तर तो 42 टक्के होईल.
सरकारने यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली होती. अशातच आता लवकरच सरकार महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. जर असे झाले तर 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना याचा फायदा होईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार येत्या 1 मार्च 2023 रोजी होणार्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसेच पेन्शनधारकांना महागाई सवलत यावर सरकार अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. असे झाले तर होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीची मोठी भेट मिळेल.
फक्त इतकेच नाही तर सर्व काही सुरळीत राहिले तर कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत वाढवून पगार मिळेल. पेन्शनधारकांनाही वाढीव पेन्शन मिळेल. याशिवाय जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या थकबाकीचे पैसेही त्यांच्या खात्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डीएमध्ये होणार 4 टक्के वाढ
डिसेंबर 2022 साठी AICPI ची आकडेवारी कामगार मंत्रालयाकडून जारी करण्यात आली आहे. यावरून डीए आणि डीआरमध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकेल, असे दिसत आहे. जाहीर केलेल्या डिसेंबर 2022 मधील AICPI आकडेवारी नोव्हेंबरच्या तुलनेत घसरली असून एआयसीपीआयच्या आकडेवारीत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सतत वाढ झाली.
नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरचा आकडा 132.3 अंकांवर घसरला होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हा आकडा 132.5 अंकांवर होता. सप्टेंबरमध्ये ते 131.3, ऑगस्टमध्ये 130.2 आणि जुलैमध्ये 129.9 होते. अशातच आता त्यानंतरही महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महागाई भत्त्यात 42 टक्क्यांपर्यंत होणार वाढ
शक्यतो महागाई भत्ता होळीपूर्वी जाहीर करण्यात येतो. जर महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा खर्च सध्याच्या 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांवर येईल. सप्टेंबर 2022 मध्ये डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर आता हे कर्मचारी नवीन वर्षात महागाई भत्त्यात वाढ होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
90,720 रुपये असणार महागाई भत्ता
या कर्मचाऱ्यांना सध्या 38 टक्के दराने महागाई भत्ता देण्यात येत आहे. त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्यास तो 42 टक्के होईल. यानंतर, 18,000 रुपये मूळ वेतन असलेल्यांसाठी वार्षिक महागाई भत्ता वाढून 90,720 रुपये होईल. अशातच जर सध्याच्या महागाई भत्त्यातील फरकाबाबत बोलायचे झाल्यास पगारात प्रत्येक महिन्याला 720 रुपये आणि वार्षिक 8640 रुपयांची वाढ होऊ शकते.
लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा
केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली तर एकूण 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल. सरकारने वर्षाच्या सुरुवातीला महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली, त्यानंतर महागाई भत्ता 38 टक्क्यांवर गेला होता. आता 4 टक्क्यांनी वाढ केल्याने महागाई भत्ता 42 टक्के होईल.
वर्षातून दोनवेळा बदल केला जातो
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनवेळा सुधारणा करण्यात येते. पहिला जानेवारी ते जून या कालावधीत दिला जातो, तर दुसरा जुलै ते डिसेंबर दरम्यान येतो. AICPI निर्देशांक केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते.