Udayanaraje : ‘माझं वय मी सांगणार नाही आणि कुणी सांगायचा प्रयत्न केला तर याद राखा, मी कोणाला सोडणार नाही’

Published on -

Udayanaraje : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले यांचा उद्या वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात दोन दिवस आधीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात दरवर्षी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

सध्या सातारा शहरात विविध ठिकाणी शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत. बुधवारी रात्री साताऱ्यातील गांधी मैदानावर शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी उदयनराजे उपस्थित होते. यावेळी त्यांनी नेहेमीच्या अंदाजात उपस्थित तरुणांची मने जिंकली.

यावेळी ते म्हणाले, माझं वय मी सांगणार नाही आणि कुणी सांगायचा प्रयत्न केला तर याद राखा. मी कोणाला सोडणार नाही, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी कॉलर उडवून उपस्थित तरुणांची मने जिंकली.

यावेळी अभिनेता अनुप सिंह ठाकूर उपस्थित होता. उदयनराजेंनी यावेळी नेहमी प्रमाणे आपली कॉलर उडवली. त्यामुळे उपस्थित तरुणांनी एकच जल्लोष केला. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्पर्धक देखील आले होते.

उदयनराजे म्हणाले, मी जर या ठिकाणी स्पर्धेत पोज मारायला लागलो, तर इथे कोणीही थांबणार नाही, यावेळी एकच जल्लोष करण्यात आला. उदयनराजे नेहेमी आपल्या वेगळ्या अंदाजासाठी चर्चेत असतात. त्यांचे राज्यात अनेक चाहते आहेत. ते कधी कोणाला काय बोलतील याचा अंदाज भल्या- भल्यांना येत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe