Best Cars : बलेनो-वॅगन आर नाही तर कारप्रेमींची ‘या’ कारला सर्वाधिक पसंती, किंमत आहे 3.54 लाख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Cars : मारुती सुझुकी या दिग्ग्ज कार उत्पादक कंपनीचा भारतीय बाजारात चांगलाच दबदबा आहे. ही कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते.

अशातच आता कंपनीची अल्टो कार ही सर्वात जास्त विक्री होणारी कार बनली आहे. या कारने जानेवारी 2023 मध्ये, सर्वात जास्त युनिट्सची विक्री केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या या कारची किंमत 3.54 लाख रुपये इतकी आहे. याबाबत पाहुयात सविस्तर माहिती.

या आहेत सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कार

मारुती सुझुकीच्या सर्वात लहान हॅचबॅक अल्टो या कारची मागील महिन्यात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये सर्वात जास्त विक्री झाली होती, एकूण 21,411 युनिट्सची विक्री झाली होती, जी गेल्या वर्षी (जानेवारी 2022) याच महिन्याच्या तुलनेत सुमारे 70 टक्के जास्त आहे.

मारुतीच्या या कारची सुरुवातीची किंमत 3.54 लाख रुपये इतकी आहे, हे लक्षात घ्या की ही किंमत Alto 800 च्या बेस व्हेरिएंटची आहे. विक्रीच्या बाबतीत बॉक्सी डिझाइन असलेली वॅगनआर ही देशातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे.

जानेवारी 2023 मध्ये वॅगनआरच्या एकूण 20,466 युनिट्सची विक्री झाली आहे. ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. मारुती स्विफ्ट ही अल्टो आणि वॅगनआर नंतर तिसरी सर्वात जास्त विक्री होणारी कार होती. मागच्या महिन्यात मारुतीने त्यातील 16,440 युनिट्सची विक्री केली आहे, जी जानेवारी 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 19,108 युनिट्सपेक्षा खूप कमी आहे. त्याच्या विक्रीत वार्षिक आधारावर घट नोंदवण्यात आली आहे.

त्यानंतर मारुती बलेनो ही चौथ्या क्रमांकावर तर टाटा नेक्सॉन ही पाचव्या क्रमांकावर आहे. नवीन जनरेशन बलेनो गेल्या वर्षीच लॉन्च केली होती. जानेवारी 2023 मध्ये मारुतीने त्यातील 16,357 युनिट्स विकल्या आहेत. तर SUV सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या Tata Nexon ने जानेवारी 2023 मध्ये 15,567 युनिट्स विकल्या आहेत.