SNDT Women’s University Bharti 2024 : मुंबईतील SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. याठिकाणी कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत पाहूया…
वरील भरती अंतर्गत “नर्सरी पर्यवेक्षक, वरिष्ठ नर्सरी शिक्षक, कनिष्ठ नर्सरी शिक्षक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहेत. तर अर्ज 13 मे 2024 अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवगेळी असेल.
नर्सरी पर्यवेक्षक : M.Sc. Early Childhood Education or M.Sc. Human Development
वरिष्ठ नर्सरी शिक्षक : M.Sc. Human Development or M.Sc. Early Childhood Education
कनिष्ठ नर्सरी शिक्षक : M.Sc. Human Development, M.Sc. Early Childhood Education
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
ऑफलाईन अर्ज प्रमुख, मानव विकास विभाग, SNDT महिला विद्यापीठ, जुहू कॅम्पस, मुंबई या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत,
ई-मेल पत्ता
तर ऑनलाईन अर्ज humand@sndt.ac.in या ई-मेलवर सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://sndt.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिल्याप्रमाणे पाठवायचे आहेत.
-अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.