Mahindra XUV 3XO : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. विशेषता ज्यांना एसयुव्ही कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीने आपली नवीन SUV कार लॉन्च केली आहे. खरे तर अलीकडे नवयुवकांमध्ये एसयुव्ही कारची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. सेडान कारपेक्षा SUV ला मोठी मागणी आहे.
SUV कारचे स्टायलिश लूक अन दमदार फिचर्स तरुणांना आकर्षित करत आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर देशातील महिंद्रा या ऑटो दिग्गज कंपनीने Mahindra XUV 3XO या बहुचर्चित कारची लाँचिंग केली आहे. भारतात नुकतीच ही कार लाँच झाली असून आज आपण या कारचे स्पेसिफिकेशन तथा किंमत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरतर या SUV च्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगलेल्या आहेत. यामुळे ही कार भारतीय बाजारात केव्हा लॉन्च होणार? असा सवाल कार प्रेमींच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. आता मात्र ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च झाली आहे.
नव्याने लाँच झालेल्या SUV चे लुक्स अन डिजाईन
सर्वप्रथम, महिंद्रा कंपनीच्या या नव्याने लॉन्च झालेल्या एसयूव्हीच्या लुक्स आणि डिझाईन बाबत माहिती पाहूया. या गाडीच्या डिझाइनबाबत बोलायच झालं तर कंपनीने या गाडीला स्पोर्टी लूक दिला आहे. यामुळे ही गाडी तरुण वर्गाला विशेष आकर्षित करणार असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. ही गाडी पहिल्यांदाच पाहिली तर XUV400 इलेक्ट्रिक सारखी भासते.
या गाडीचा फ्रंट लूक हा पूर्णपणे नवीन आहे. गाडीची रचना ही कंपनीने आपल्याच ‘BE’ लाइन-अपपासून प्रेरित होऊन डिझाईन केली आहे. यात नवीन डिझाइन केलेले ड्रॉप-डाउन एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, त्रिकोणी इन्सर्टसह नवीन ग्रिल सेक्शन आणि नवीन हेडलॅम्प्स पाहायला मिळतं आहेत.
कंपनीने या एसयूव्हीचा बॅक साईड, मागील पार्ट देखील पूर्णपणे नवीन पद्धतीने डिझाइन केला आहे. यात मोठा C आकाराचा LED टेल लॅम्प देण्यात आला आहे. जर तुम्हीही स्पोर्टी लूक असणारी SUV खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही नव्याने लॉन्च झालेली गाडी तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकते.
गाडीचे इंटेरियर आणि फीचर्स कसे आहेत
Mahindra कंपनी SUV सेगमेंट मध्ये नेहमीच नवनवीन मॉडेल लॉन्च करत असते. कंपनीच्या एसयूव्ही सेगमेंट मधील गाड्यांमध्ये अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतात. या नव्याने बाजारात लॉन्च झालेल्या एसयूव्ही मध्ये देखील दमदार फीचर्स लोडेड आहेत.
या गाडीचे इंटेरियर देखील कंपनीने खूपच प्रीमियम दर्जाचे ठेवले आहेत. याच्या केबिनला प्रीमियम टच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात नवीन डिझाइनचे डॅशबोर्ड आहे. 10.25” इंफोटेनमेंट सिस्टम आणि सराउंड साउंड स्पीकर देण्यात आले आहेत.
या SUV मध्ये रिमोट क्लायमेट कंट्रोल फीचर देखील दिले जात आहे जे Adrenox ॲप वरून ऑपरेट होणार अशी माहिती देण्यात आली आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरूनच कारच्या केबिनचे तापमान नियंत्रित करू शकणार आहात. म्हणजे या गाडीचे काही फीचर्स हे प्रीमियम गाड्यांसारखेच आहेत.
गाडीची किंमत काय राहणार?
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गाडीची किंमत किती आहे. अतिशय आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या SUV ची सुरवातीची एक्स शोरूम किंमत फक्त 7.49 लाख रुपये एवढी आहे. मात्र ही किंमत या एसयुवीच्या बेस वॅरीयंटची आहे.