Mahindra’s Best SUV : भारतात सतत कार्सची मागणी वाढत आहे. अशातच मार्केटमध्ये SUV कारचा ट्रेंड वाढत चालला आहे. अनेकजण SUV ला सर्वात जास्त पसंती देत आहेत. परंतु अशा वाहनांच्या किमती खूप आहेत. महिंद्रा ही भारतीय बाजारातील दिग्ग्ज कार उत्पादक कंपनी आहे.
काही दिवसांपूर्वी कंपनीने SUV XUV700 लाँच केली होती. ही कार सर्वात जास्त परवडणारी 7 सीटर SUV बनली आहे. तिने महिंद्रा बोलेरोला मागे टाकले आहे. ही दीर्घकाळ सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही होती. पाहुयात या XUV700 चे फीचर्स आणि किंमत
कंपनीची महिंद्रा स्कॉर्पिओ-एन एकूण 30 प्रकारांमध्ये येत असून त्यांची किंमत 12.74 लाख रुपये ते 24.05 लाख रुपये एक्स-शोरूम इतकी आहे. हे दोन इंजिन पर्यायांसह येते – 2.2 डिझेल (132bhp/175bhp) आणि 2.0L पेट्रोल इंजिन (203bhp). तसेच महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक दोन प्रकारांमध्ये येते – S आणि S11. त्यांची किंमत अनुक्रमे 12.64 लाख आणि 16.14 लाख रुपये इतकी आहे. याला 2.2L टर्बो डिझेल इंजिन (132bhp आणि 300Nm जनरेट करते) मिळते.
इतकी होते विक्री
महिंद्रा बोलेरो ही सर्वात जास्त विक्री होणारी जानेवारी 2023 मध्ये कंपनीची दुसरी SUV ठरली असून वार्षिक आधारावर त्याच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. मागच्या वर्षी, कंपनीने जानेवारी (2022) मध्ये त्यातील 3,506 युनिट्सची विक्री झाली, तर यावर्षी जानेवारी (2023) मध्ये 8,574 युनिट्सची विक्री केली आहे.
त्याची विक्री वार्षिक आधारावर 145 टक्क्यांनी वाढली आहे. SUV मॉडेल लाइनअप तीन प्रकारांमध्ये येते – B4, B6 आणि B6 (O). त्यांची किंमत अनुक्रमे 9.53 लाख, 10 लाख आणि 10.48 लाख रुपये इतकी आहे.
यानंतर कंपनीची तिसरी सर्वात जास्त विक्री होणारी SUV XUV700 ही आहे. या कारची जानेवारी 2023 मध्ये एकूण 5,787 युनिट्सची विक्री झाली आहे तर जानेवारी 2022 मध्ये 4,119 युनिट्सची विक्री झाली आहे. हे MX आणि AX या दोन ट्रिममध्ये 22 प्रकारांत उपलब्ध आहे. तिची किंमत 13.45 लाख ते 25.48 लाख रुपये इतकी असून यात 2.0L पेट्रोल (200bhp) आणि 2.2L डिझेल इंजिन (155bhp/185bhp) पर्याय देण्यात आले आहे.