Indira Gandhi Old Coin : आजकाल बाजारात जुनी नाणी आणि नोटांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. पण चलनातून बंद झालेली नोटा आणि नाणी सध्या दुर्मिळ होत चालली आहेत. ज्या लोकांना जुनी आणि नोटांचा संग्रह करण्याची आवड आहे अशा लोकांकडे सहज याप्रकारची नाणी मिळतील.
पण जुनी नाणी आणि आणि नोटा विकून तुम्ही देखील रातोरात लखपती होऊ शकता. तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र हो हे खरं आहे. कारण अशा नाणी नोटांना बाजारात मागणी वाढली आहे.
जर तुमच्याकडे इंदिरा गांधी यांचा फोटो असलेले हे ५ रुपयांचे जुने नाणे असेल तर तुम्ही ते विकून चांगली कमाई करू शकता. अशी नाणी विकण्यासाठी काही ऑनलाईन वेबसाइट देखील उपलब्ध आहेत. त्यावर तुम्ही तुमच्याकडील जुने नाणे विकू शकता.
तुमच्याकडे हे नाणे आहे का?
१९१७ ते १९८४ या दरम्यान चलनात इंदिरा गांधी यांचा फोटो असलेले ५ रुपयांचे एक नाणे होते. मात्र आता तुम्हाला अशा प्रकारचे नाणे चलनात दिसणार नाही. पण जर तुमच्याकडे असे नाणे असेल तर तुम्हीही नाणे ऑनलाईन विकून २ ते ३ लाख सहज मिळवू शकता.
तुम्हाला हे नाणे विकण्यासाठी कोणत्याही बाजारात जाण्याची गरज नाही तर तुम्ही घरबसल्या quickr किंवा ebay या ऑनलाईन वेबसाइट वर हे नाणे विकू शकता. त्याआधी तुम्हाला याठिकाणी तुमच्या नाण्याचा फोटो अपलोड करावा लागेल.
हे नाणे घेण्यासाठी जो कोणी ग्राहक इच्छुक असेल तो तुमच्याशी संपर्क करेल. त्यानंतर तुम्ही त्यासोबत बोलणी करून नाणे विकू शकता. पण आगोदर संपूर्ण माहिती घेऊनच तुम्ही हे नाणे विका अन्यथा तुमची फसवणूक देखील होऊ शकते.
अशा प्रकारे विका ऑनलाइन नाणी
हे नाणे विकण्यासाठी प्रथम www.ebay.com वर जा.
मुख्यपृष्ठावर, तुम्ही आता नोंदणी करू शकता.
तुम्ही येथे ‘विक्रेता’ म्हणून नोंदणी करू शकता.
तुमच्या मेमोचे स्पष्ट चित्र घ्या आणि ते वेबसाइटवर अपलोड करा.
eBay नंतर तुमची जाहिरात अशा लोकांना दाखवेल जे हे प्लॅटफॉर्म वापरतात आणि जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्यात स्वारस्य आहेत.
ज्यांना ही ऐतिहासिक नोट खरेदी करायची आहे ते आता तुमच्याशी संपर्क साधतील.
या लोकांशी संपर्क करून तुम्ही तुमच्या नोटसाठी कोट मिळवू शकता.