Free Disney+ Hotstar Subscription :आजकाल अनेकजण चित्रपट गृहात न जाता घरबसल्या स्मार्टफोनवर नवीन चित्रपट पाहत आहेत. ग्राहकांना आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाल्याने घरबसल्या सर्व सुविधा मिळू लागल्या आहेत.
क्रिकेट पाहण्यासाठी अगोदर टीव्हीचा वापर केला जायचा मात्र आता प्रत्येकजण स्मार्टफोनवर Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन घेऊन त्यावर क्रिकेट पाहत आहेत. पण यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. मात्र आता तुम्हाला Disney+ Hotstar मोफत मिळू शकते.
टेलिकॉम कंपन्यांकडून आता ग्राहकांसाठी भन्नाट रिचार्ज प्लॅन आणले आहेत. ते रिचार्ज करून ग्राहक मोफत ओटीटी प्लॅफॉर्म्सचा आनंद घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला टेलिकॉम कंपन्यांकडून सादर करण्यात आलेले रिचार्ज करावे लागतील.
एअरटेल 399 रिचार्ज प्लॅन
जर तुम्ही एअरटेल टेलिकॉम कंपनीचे ग्राहक असाल तर तुम्हाला ३९९ रुपायांचा रिचार्ज करावा लागेल. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5 GB इंटरनेट डेटा मिळेल. तसेच दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील मिळतील. यामध्ये तुम्हाला 3 महिन्यांसाठी डिस्ने + हॉटस्टार सब्सक्रिप्शन देखील मिळेल.
एअरटेल 499 रिचार्ज प्लॅन
जर तुमच्याकडे एअरटेल कंपनीचे सिमकार्ड असेल तर तुम्ही ४९९ रुपयांचा रिचार्ज करून 3 महिन्यांसाठी विनामूल्य Disney + Hotstar सब्सक्रिप्शन मिळवू शकता. तसेच अमर्यादित कॉलिंगसह प्रतिदिन 3 GB इंटरनेट डेटा आणि दररोज 100 SMS देखील मिळतील.
Vodafone-Idea (Vi) 399 रिचार्ज प्लॅन
जर तुम्ही Vi टेलिकॉम कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कंपनीने 399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना Disney + Hotstar मोफत सबस्क्रिप्शनसह 3 महिन्यांपर्यंत मिळेल. तसेच दररोज 2.5 GB इंटरनेट डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल.
Vi 499 रिचार्ज प्लॅन
Vi कंपनीकडून ग्राहकांसाठी आणखी एक भन्नाट प्लॅन आणला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. यामध्ये प्रतिदिन 3 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह 100 SMS दिले जातात. तसेच 3 महिन्यांसाठी विनामूल्य Disney + Hotstar सब्सक्रिप्शन दिले जात आहे.