Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर त्यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा निर्णय लागू होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
यानंतर या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात उतरले होते. त्यांनी देखील ट्विट केले आहे. ते म्हणाले, तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल.
तसेच तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. दरम्यान, शरद पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भेट घेतली होती. रात्री अकरा वाजता ते याठिकाणी गेले होते. यामुळे याची बरीच चर्चा झाली होती.
तेव्हा याबाबत विद्यार्थ्यांना अश्वासनही देण्यात आले होते. त्यानंतर आज विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे असे ट्विट एमपीएसीने केले आहे.
दरम्यान, चार ते पाच दिवसांपासून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन पुकारले होते. राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. यासाठी अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला होता.