Anna Bansode : पहाटेच्या शपथविधीवर तेव्हा उपस्थित असलेला आमदार थेटच बोलला, म्हणाले अजितदादा म्हणतील तसच…

Published on -

Anna Bansode : सध्या राज्यात पहाटेच्या शपथविधीवरून अनेक वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर यासह अनेक नेत्यांनी वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत. यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

असे असताना ज्यावेळी हा शपथविधी झाला, त्यावेळी उपस्थित असलेल्या आमदाराने याबाबत माहिती दिली आहे. पवारांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही एक विधान केले आहे.

ते म्हणाले, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधी कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचा साक्षीदार असल्याचे समाधान आणि अजित पवारांना साथ दिली याचा आनंद आहे. तो शपथविधी राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी होता, हे काल शरद पवार यांनी सांगितले.

त्यामुळे मी जे केले ते योग्यच होते, असेही ते म्हणाले. तसेच शपथविधीच्या अगोदर पहाटेच अजित पवार यांचा फोन आला होता. तुम्ही आहे त्या परिस्थित मुंबईत या, असं अजितदादांनी सांगितले. त्यानंतर साडेतीन तासात तिथे पोहचलो.

तेव्हा माझ्या डोळ्याने पाहिले की अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे शपथ घेत होते. ती घटना माझ्यासाठी धक्का देणारी होती. दादा जसे म्हटले तस मी केले. म्हणून मी त्या शपथविधीच्या कार्यक्रमात उपस्थित होतो. दादा करतील ते योग्य म्हणून आम्ही त्यांच्यासोबत कोण आहे किंवा कोणासोबत शपथ घेत आहेत हे पाहिले नाही, असा खुलासा देखील त्यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe