Fire-Bolt Phoenix Pro : जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टवॉच आता 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार; जाणून घ्या सविस्तर

Published on -

Fire-Bolt Phoenix Pro : फायर-बोल्ट या स्मार्टवॉच निर्माता कंपनीने आपले आणखी एक नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. जास्त मागणी असल्यामुळे आता स्मार्टवॉचच्या किमती वाढल्या आहेत. परंतु, तुम्ही आता या कंपनीचे स्मार्टवॉच 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.

कंपनीने Phoenix Pro स्मार्टवॉच लाँच केले आहे. आपल्या इतर स्मार्टवॉचप्रमाणे या स्मार्टवॉचमध्येही कंपनीने एकापेक्षा एक असे शानदार फीचर्स दिले आहेत. ही कंपनी वेगवेगळ्या सेगमेंट आणि वैशिष्ट्यांसह नवीन स्मार्टवॉच लाँच करत आहे.

या कंपनीने भारतात आपले स्मार्टवॉच फिनिक्स प्रो लॉन्च केले असून किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी आहे. तुम्हाला यात शानदार फीचर्स पाहायला मिळतील. कंपनीचे हे एक परवडणारे स्मार्टवॉच असून जे मेटल शॉक-प्रूफ बॉडीसह येते.

स्पेसिफिकेशन

या स्मार्टवॉचची जबरदस्त आणि स्टाइलिश मेटल शॉक-प्रूफ बॉडी आहे. त्याच्या डिझाइन-टू-परफेक्शनमध्ये 240×240 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह एक मोठा गोल 1.39 डिस्प्ले कंपनीने दिला आहे. हे स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येते.

किती असणार किंमत

या स्मार्टवॉचची किंमत केवळ 1799 रुपये इतकी आहे. हे ब्लॅक, ग्रे आणि पिंक अशा तीन रंग पर्यायात उपलब्ध आहे. जर तुम्हाला ते विकत घ्यायचे असेल तर तुम्ही ते अॅमेझॉनवरून विकत घेऊ शकता. लवकरच हे स्मार्टवॉच इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही येऊ शकते.

जाणून घ्या फीचर्स

फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाले तर यात कंपनीने नोटिफिकेशन्स, हवामान अपडेट्स, ड्रिंक वॉटर रिमाइंडर, कॅमेरा कंट्रोल, अलार्म आणि स्टॉपवॉच सारखी फीचर्स दिली आहेत. इतकेच नाही तर यात 100 पेक्षा जास्त क्लाउड-आधारित वॉच फेस, 120 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आणि स्टेप्स काउंट फीचर्सचाही समावेश आहे.

इतर फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास तुमच्या वॉचमध्ये हृदय गती, SpO2 आणि झोपेचे चक्र यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी तपासण्यासाठी एक प्रगत आरोग्य संच आहे. यात फिमेल हेल्थ ट्रॅकर आणि मेडिटेटिव्ह ब्रीदिंग उपलब्ध आहेत.

यात तुम्हाला व्हॉईस असिस्टंट सपोर्ट मिळेल जो रिमाइंडर्स सेट करण्यासाठी आणि वॉचच्या इतर वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी व्हॉइस कमांड सक्षम करतो. या स्मार्टवॉचच्या बॅटरीचे आयुष्य जास्त आहे कारण ते सामान्य मोडमध्ये 7 दिवसांपर्यंत आणि स्टँडबायवर 30 दिवसांपर्यंत चालते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News