Cheap Flight Tickets : फिरायला कोणाला आवडत नाही. अशातच आता फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता एक अवघ्या हजार रुपयात कुठंही आणि कितीही फिरू शकता. अवघ्या हजार रुपयात तुम्ही तुमचे फिरायचे स्वप्न पूर्ण करू शकता.
होय, आता इंडिगो आणि गो फर्स्टने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. त्यामुळे तुम्ही आता स्वस्तात फिरू शकता. परंतु, त्याअगोदर हे लक्षात ठेवा की तुम्हाला आजच तिकीट बुक करावे लागणार आहे. तिकीट बुक करण्याची आजची शेवटची संधी आहे.

आधी बुक करा, मग फिरा
GoFirst देशांतर्गत केवळ 1,199 रुपये आणि आंतरराष्ट्रीय साठी 6,139 रुपयात विमानाचे तिकीट ऑफर करत आहे. याबाबत GoFirst ने एक ट्विट केले असून, ‘ऑन-बोर्ड #Fabfebsale. हे लक्षात घ्या की आजच्या दिवस तिकीट बुक केले जाणार आहे.
प्रवासाचा कालावधी 12 मार्च ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्ही आजच तिकीट बुक करून 12 मार्च नंतर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कधीही आणि कुठेही फिरू शकता. जर तुम्हाला तिकीट बुक करायचे असेल तर तुम्ही https://bit.ly/3xlrzon या वेबसाइटला भेट द्या.
याबाबत कंपनीने असे सांगितले की ही ऑफर इतर कोणत्याही ऑफरसह एकत्रित केली जाणार नाही तसेच ग्रुप बुकिंगवर लागू नाही. अशी माहिती देण्यात आली की रद्द करण्याच्या मानक अटी आणि शर्ती बुकिंगच्या वेळी आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर लागू होणाऱ्या सीटच्या उपलब्धतेच्या अधीन असणार आहे.
जाणून घ्या इंडिगोच्या तिकिटांची किंमत
आता इंडिगोच्या तिकिटांबद्दल बोलायचे झाले तर इंडिगो देशांतर्गत विमान तिकिटांची किंमत 2,093 रुपयांपासून सुरू होत आहे. विशेष ऑफर 13 मार्च ते 13 ऑक्टोबर या कालावधीसाठी उपलब्ध असणार आहे. 13-मार्च-23 आणि 13-ऑक्टोबर-23 दरम्यानच्या प्रवासासाठी तुम्ही 25-फेब्रु-23 पूर्वी इंडिगो तिकीट बुक करू शकता. जर तुम्हाला तिकीट बुक करायचे असेल तर तुम्ही http://bit.ly/3impnso या वेबसाइटला भेट द्या.