आता मुंबईहून पनवेलमार्गे गाठता येणार कर्जत; सर्वाधिक लांबीच्या बोगद्यामधून तयार होणार नवीन रेल्वेमार्ग, 30 किलोमीटर लांबीसाठी 2782 कोटींचा खर्च; पहा स्टेशन्स….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai News : सध्या राजधानी मुंबई आणि मुंबई उपनगरातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. रस्ते विकासाची तसेच रेल्वे विकासाची कामे मुंबई व उपनगरात सध्या सुरू आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातूनही एक नवीन रेल्वे मार्ग विकसित केला जात असून यामुळे आता मुंबईहून पनवेल मार्गे कर्जत गाठता येणार आहे. खरं पाहता मुंबई नागरी परिवहन प्रकल्प तीन अंतर्गत पनवेल कर्जत लोकल रेल्वे मार्ग विकसित केला जात आहे.

हा रेल्वे मार्ग एकूण 30 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या प्रकल्पांतर्गत सर्वाधिक लांबीच्या बोगद्याची निर्मिती केली जात असून या बोगद्यामधून रेल्वे ट्रॅक जाणार आहेत. विशेष म्हणजे या बोगद्याच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या जो पारसिक बोगदा आहे त्याच्या दुपटीने याची लांबी राहणार आहे. याची लांबी जवळपास 2600 मीटर इतकी राहणार आहे.

पारसिक बोगदा हा जवळपास 1200 ते 1300 मीटर लांबीचा आहे. निश्चितच हा सर्वाधिक लांबीचा बोगदा या रेल्वेमार्ग प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या रेल्वे प्रकल्पामुळे मुंबईहून पनवेल मार्गे कर्जत गाठता येणे शक्य होणार आहे. साहजिकच सध्या स्थितीला कल्याण मार्गे कर्जत जावे लागत आहे. यामुळे प्रवाशांना अधिकचा वेळ खर्च करावा लागत आहे. अशा परिस्थितीत हा प्रस्तावित केलेला मार्ग तयार केल्यानंतर प्रवाशांची वेळेची बचत होणार आहे. यामुळे मुंबईमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे.

पनवेल आणि कर्जत या नवोदित शहरांचा यामुळे विकास साध्य होणार आहे. निश्चितच वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या शासन प्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या बहुउद्देशीय प्रकल्पाच्या माध्यमातून सार्वजनिक विकास देखील साध्य होणार आहे. वास्तविक, या रेल्वे मार्ग प्रकल्पामध्ये एकूण तीन बोगदे राहणार आहेत. यापैकी एक बोगदा हा मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा राहणार आहे जो की वावर्ले येथे तयार होत आहे. हाच बोगदा पारसिक बोगद्यापेक्षा दुपटीने लांब असेल म्हणजेच जवळपास 2,600 मीटर लांबी याची राहणार आहे.

याशिवाय या प्रकल्पात आणखी दोन बोगदे विकसित केले जात आहेत नढाल या ठिकाणी एक बोगदा होणार असून याची लांबी 219 मीटर आणि किरवली मध्ये एक बोगदा या प्रकल्पांतर्गत विकसित केला जाणारा असून याची लांबी 300 मीटर इतकी राहणार आहे. याशिवाय या प्रकल्पांतर्गत दोन उड्डाणपुले तयार होणार आहेत. कर्जत आणि पनवेल जवळ ही उड्डाणपुले राहणार आहेत. कर्जत जवळील उड्डाणपूल 1225 मीटरचा राहणार आहे तर पनवेल जवळचा उड्डाणपूल हा 1375 मीटरचा राहणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प 2025 मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे टारगेट ठेवण्यात आले आहे.

निश्चितच या नव्याने विकसित होत असलेल्या रेल्वे मार्गामुळे पनवेल आणि कर्जत या नवोदित शहरांचा विकास होणार आहे. शिवाय मुंबईहून कल्याण मार्गे कर्जतला जाण्याऐवजी आता मुंबईहून पनवेल मार्गे कर्जतला जाता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचेल. मिळालेल्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकल्प विकसित करण्यासाठी 2782 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांतर्गत जसे की आपण आधी पाहिलंच तीन बोगदे उभारले जाणार आहेत तसेच दोन गुड्डाणपुले देखील तयार होणार आहेत.

या प्रकल्पाची एकूण लांबी तीस किलोमीटर इतकी राहणार आहे. तसेच आरओबी/आरयूबी – ५ रोड ओव्हरब्रिज, १५ रोड अंडरब्रिज, रुळ ओलांडणीसाठी एक पादचारी पूल देखील विकसित होणार आहेत. तसेच या प्रकल्पाअंतर्गत 36 लहान पूल आणि आठ मोठे पूल विकसित होणार आहेत. या रेल्वे मार्गात पाच रेल्वे स्टेशन्स राहणार आहेत. पनवेल, चिखले, मोहपे, चौक, कर्जत या ठिकाणी ही स्थानके राहणार आहेत. निश्चितच हा बहुउद्देशीय प्रकल्प मुंबई उपनगरीय वाहतूक व्यवस्था बळकट करण्यास महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.