भारतीय मार्केटमध्ये डॅशिंग आणि साहसी वाहन पर्यायांमध्ये मारुती जिम्नी व महिंद्रा थार नंतर भारतीय बनावटीची म्हणजेच मेड इन इंडिया गोरखा लॉन्च करण्यात आलेली असून ती फोर्स मोटरने लॉन्च केली. विशेष म्हणजे ही कार तीन आणि पाच डोअर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे.
एससीयुव्ही सेगमेंट मधील कार असून तीन आणि पाच डोअर अशा दोन्ही प्रकारांमध्ये समान इंजिन देण्यात आलेले आहे. फोर्स मोटर्सच्या माध्यमातून या 2024 मधील गोरखाच्या इंटरियर आणि आऊटर म्हणजेच आतील व बाहेरील भागांमध्ये बरेच बदल केले असून यामध्ये एलईडी डीआरएल सह गोलाकार आकाराचे एलईडी हेडलॅम्प आणि फॉगलॅम्प देण्यात आलेले आहेत. तसेच फोर्स मोटर्सने या एसयूव्हीला 18 इंचाचे अलोय व्हील दिलेले आहेत व ते माउंटन रनिंगमध्ये या एसयुव्हीला खूप मदत करते.
काय आहेत फोर्स गोरखा एसयूव्हीची वैशिष्ट्ये?
फोर्स गोरखाला एक परिचित असा डॅशबोर्ड देण्यात आला असून यामध्ये नऊ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. जो एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी कनेक्ट केला जाऊ शकतो. तसेच या कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला असून टेलिस्कोपिक ऍडजेस्टेबल स्टेरिंग व्हिल, ड्युअल एअर बॅग, इबिडी आणि टीपीएमएस इत्यादी वैशिष्ट्ये देण्यात आली असून ही कार सात सीट पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
कसे आहे इंजिन?
फोर्स गोरखा एसयुव्हीमध्ये 2.6 लिटर चार सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे व ते 138 बीएचपी पावर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच या कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आणि 4×4 व्हील ड्राईव्हचा पर्याय देण्यात आला आहे. फोर्स मोटारने गोरखा एसयूव्ही तीन आणि पाच डोअर पर्यायांमध्ये सादर केली असून या दोन्ही प्रकारांमध्ये समान इंजिन दिली आहे.
किती आहे या फोर्स गोरखा एसयूव्हीची किंमत?
आपण पाहिले की एसयूव्ही तीन आणि पाच डोअर पर्यायांमध्ये सादर करण्यात आली असून यातील पाच डोअर फोर्स गोरखाची एक्स शोरूम किंमत 16 लाख 75 हजार रुपयांपासून सुरू होते. तसेच फोर्स गोरखाच्या पाच डोअर व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत अठरा लाख रुपयांच्या किमती पासून सुरू होते.
विशेष म्हणजे फोर्स कंपनीच्या माध्यमातून या कारचे बुकिंग सुरू करण्यात आले असून तुम्ही 25000 रुपये भरून बुकिंग करू शकतात व या कारची डिलिव्हरी मे महिन्यामध्ये सुरू होणार आहे.