Mhada House Scam : धक्कादायक ! म्हाडाच घर देण्याचं आमिष दाखवून ‘इतक्या’ लोकांचीं कोट्यावधीचीं फसवणूक; मुंबईतल्या प्रकाराने खळबळ, ‘ही’ काळजी घ्या

Published on -

Mhada House Scam :  राजधानी मुंबई व उपनगरात सर्वसामान्यांना घर घेणं म्हणजे दिवसा ढवळ्या स्वप्न पाहणं अशी परिस्थिती झाली आहे. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. गगनस्पर्शी इमारतीच्या या शहरात सदनिकांच्या किमतीने घेतलेली गगनभरारी पाहता मध्यमवर्गीयांना सदनिका विकसित करणे, उभारणे किंवा विकत घेणे हे मध्यमवर्गीयांना हजारो मैलापार असलेल्या चंद्राला मुठीत घेण्यासारखे वाटू लागले आहे.

परिणामी मध्यमवर्गीय तसेच उच्च मध्यमवर्गीय लोक म्हाडा आणि सिडकोच्या घराच्या सोडतीची आतुरतेने वाट पाहत असतात. हाती आलेल्या माहितीनुसार ठाणे, वसई-विरार या उपनगरात येत्या काही दिवसात कोकण मंडळाकडून घरांची सोडत जारी होणार आहे. 4 हजार 752 घरांसाठी 11 एप्रिल रोजी ठाणे येथे घरांची सोडत जारी होणार आहे.

याशिवाय मुंबईमध्ये ही पुढील महिन्यात घर सोडतीसाठी म्हाडा कडून प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान याच उत्सुकतेचा फायदा घेत काही लोकांकडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. प्रभादेवी भागातील सेंचुरी बाजार भागात म्हाडाचे घर मिळवून देतो असं आमिष दाखवून तब्बल 21 जणांची फसवणूक करण्यात आली आहे.

म्हणजे या 21 जणांकडून दोन कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम बळकावण्यात आली आहे. यामुळे म्हाडा घर सोडती संदर्भात नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अशा आमिष दाखवणाऱ्या लोकांपासून सावध रहावे असं जाणकार सांगत आहेत. दरम्यान या प्रकरणात सहा जणांविरुद्ध दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, प्रभादेवी मधील सेंचुरी बाजार म्हाडा कॉलनीतील म्हाडाच्या गिरणी कामगारांच्या सदनिका बाजारभावापेक्षा कमी किमतीत मिळवून देण्याचं आमिष दाखवून दत्तप्रसाद बाईत या सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच आणखी 21 जणांना फसवण्यात आल आहे. सुनील घाटविसावे नामक व्यक्तीने बाईत यांना म्हाडाचे घर मिळवून देतो असं आमिष दाखवलं. बाईत यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्यांच्या नातेवाईकांसह आणि अन्य 20 लोकांनी दोन कोटी तीस लाख रुपये घाटविसावे यांना देऊ केलेत.

विशेष म्हणजे या आरोपी व्यक्तीने त्यांना म्हाडाच्या सदनिका देखील दाखवल्या. यामुळे या व्यक्तीवर या 21 जणांनी विश्वास दाखवला. मात्र, सदनिका संदर्भात त्यांना यथायोग्य माहिती उपलब्ध झाली नसल्याने या लोकांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. आता या व्यक्तिविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला असून या व्यक्तीसह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. निश्चितच नागरिकांनी अशा घटनांपासून बोध घेत अशा आमिष दाखवणाऱ्या लोकांपासून सावध राहिले पाहिजे.

अन्यथा मोठी फसवणूक नागरिकांची होऊ शकते. म्हाडाच्या घर सोडतीसाठी कोणत्याच त्रयस्थ लोकांवर विश्वास ठेवू नये. यासाठी म्हाडाकडून घरसोडतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विहित कालावधी मध्ये अर्ज भरावा. म्हाडाच्या सदनिकासाठी आवश्यक पात्रता धारक नागरिकांनी यासाठी आवश्यक अनामत रकमेसह अर्ज करावा, अधिकृत वेबसाईटवरच हा अर्ज करावा आणि म्हाडा कडून लॉटरी अथवा सोडत जारी झाल्यानंतर, आपलं सोडतीत नाव आल्यानंतर पुढील प्रक्रिया करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe