GAIL Recruitment 2023 : देशात कोरोना काळापासून अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा वेळी लोक नोकरी मिळ्वण्यासाठी धरपड करत आहेत. अशा सर्व सर्व तरुणांसाठी मोठी संधी आलेली आहे.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आलेली आहे. कारण GAIL India Limited (GAIL) ने कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GAIL Recruitment 2023) पदांसाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत.
यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार GAIL च्या अधिकृत वेबसाइट gailonline.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. याशिवाय, उमेदवार या पदांशी संबंधित वयोमर्यादा, अर्ज शुल्क, पात्रता निकष इत्यादी माहिती तुम्ही सविस्तर खाली जाणून घ्या.
GAIL मध्ये भरती करायच्या पदांची संख्या
कार्यकारी प्रशिक्षणार्थीच्या 47 जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. यापैकी 20 पदे कार्यकारी प्रशिक्षणार्थी (केमिकल), 11 पदे कार्यकारी प्रशिक्षणार्थी (सिव्हिल), 8 पदे कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Geltel TC/TM)) आणि 8 पदे कार्यकारी प्रशिक्षणार्थी (BIS) साठी आहेत.
वयोमर्यादा काय असेल?
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांची कमाल वयोमर्यादा 26 वर्षे असावी.
GAIL साठी निवड प्रक्रिया
केमिकल, सिव्हिल, GATELTEL (TC/TM), आणि BIS या विषयांमध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थीच्या भरतीसाठी अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी – 2023 (GATE-2023 गुण) च्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
वेतनमान
या पदांवर उमेदवारांची निवड झाल्यानंतर, रुपये 60000-180000/- वेतन म्हणून दिले जातील.