Electric Scooter : हिरो कंपनीच्या अनेक स्कूटर आणि बाईक बाजारात उपलब्ध आहेत. तसेच बाईक आणि स्कूटरला बाजारात प्रचंड मागणी आहे. तसेच हिरो कंपनीच्या बाईक ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. आता कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे.
दुचाकी ऑटो क्षेत्रात हिरो कंपनी भारतामध्ये दुचाकी बाईकची सर्वाधिक विक्री करणारी कंपनी ठरली आहे. कंपनीकडून जुन्या बाईक नवीन मॉडेलमध्ये लॉन्च केल्या जात आहेत. तसेच नवीन बाईकही लॉन्च केल्या जात आहेत.
भारतीय बाजारपेठेत हिरो कंपनीने एक भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. Hero Electric Photon असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. आकर्षक डिझाईन आणि जबरदस्त लूक या स्कूटरला देण्यात आला आहे.
फोटॉन इलेक्ट्रिक स्कूटर रेंज आणि टॉप स्पीड
नुकतीच भारतीय बाजारपेठेत हिरो कंपनीकडून Electric Photon स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सिंगल चार्जमध्ये १०८ किमीची रेंज देण्यात आली आहे. १०८ किलोमीटरपर्यंत ही इलेक्ट्रिक स्कूटर सहज धावू शकते असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे.
तसेच ये इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ताशी 45 किलोमीटर टॉप स्पीड देण्यात आले आहे. तुम्हाला ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन त्याच्या फ्रंट व्हील आणि रियर व्हील दोन्हीमध्ये पाहायला मिळेल.
चार्जिंग वेळ, बॅटरी आणि मोटर
हिरोच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. जी ५ तासात पूर्ण चार्ज होते. या स्कूटरमध्ये जलद गती चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. कमी वेळात जास्त चार्जिंग होत असल्याने ग्राहकही याकडे आकर्षित होत आहेत. BLDC मोटरचे कॉम्बिनेशन कंपनीकडून तयार करण्यात आले आहे.
किंमत आणि वजन
सध्या बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर वाहनांची किंमत जास्त आहे त्यामुळे अनेकांना ते घेणे शक्य होत नाही. मात्र हिरो कंपनीकडून या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 87,000 रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन 87 किलो असणार आहे.