Electric Bike : संधीच करा सोनं! अवघ्या 11,000 रुपयांमध्ये घरी आणा ही शानदार इलेक्ट्रिक बाइक, 200 किमी रेंज आणि किंमतही कमी

Ahmednagarlive24 office
Published:

Electric Bike : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे अनेकांना इंधनावरील गाड्या वापरणे परवडत नाही. त्यामुळे अनेकजण आता इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय निवडत आहेत.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर सादर झाल्या आहेत. जर तुम्हाला दमदार आणि शक्तिशाली इलेक्ट्रिक बाईक खरेदी करायची असेल तर Oben Rorr ही इलेक्ट्रिक बाईक तुम्ही खरेदी करू शकता.

भारतीय बाजारात आता Oben Rorr नावाची भन्नाट बाईक आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी एक इलेक्ट्रिक बाईकचा पर्याय उपलब्ध झाला आहे. जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर कमी किमतीमध्ये ही बाईक खरेदी करू शकता.

फक्त ११ हजारांमध्ये तुम्ही Oben Rorr इलेक्ट्रिक बाईकचे मालक बनू शकता. कमी बजेट असणारे देखील इलेक्ट्रिक बाईक घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये अनेक धमाकेदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Oben Rorr इलेक्ट्रिक बाइकची वैशिष्ट्ये

या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 4.4Kwh लिथियम आयन बॅटरीसह 1000 वॅट पॉवर मोटर देण्यात आली आहे. Oben Rorr इलेक्ट्रिक बाईकमध्ये देण्यात आलेली मोटार IPMSM तंत्रज्ञानावर काम करते.

ही इलेक्ट्रिक बाईक सिंगल चार्जमध्ये २०० किमीचे अंतर पार करते असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे. कंपनीकडून पुढच्या चाकात आणि मागच्या चाकात डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

फक्त 11000 मध्ये घरी आणा इलेक्ट्रिक बाइक

सध्या Oben Rorr इलेक्ट्रिक बाईकची किंमत 107136 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची इच्छा असेल तर तुम्ही EMI सह ही बाईक फक्त ११ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

११ हजार डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ३०८९ रुपयांचा दरमहा हफ्ता भरावा लागेल. EMI चा पर्याय उपलब्ध असल्याने अनेकांचे इलेक्ट्रिक बाईक घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe