Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार टेस्ट ट्यूब बेबी, टेस्ट ट्यूब बेबीगत बिळात अडकले’

Published on -

Eknath Shinde : सध्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सरकारवर जोरदार टीका करत आहेत. अनेकदा ते अडचणीत आले आहे, मात्र तरी ते माघार घेयच नाव घेत नाहीत. यामुळे वातावरण तापले आहे. ते सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत.

त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांचा उल्लेख थेट ‘टेस्ट ट्यूब बेबी’ असा केला. हे सगळे 40 टेस्टट्युब बेबी आहेत. त्यांचा नेताही टेस्ट ट्यूब बेबी आहे. तुम्ही पाहा, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, तेजच नाही.

त्यांचे ना बापसे होत. काय! त्यांचे जरा चेहरे बघा. हे सगळे टेस्ट ट्यूब बेबीगत बिळात अडकले आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी घणाघात केला. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. रोज वेगवेगळ्या कारणाने ते अडचणीत येत आहेत.

राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणस केली. त्याच माणसांचे सरदार केले. रिक्षा चालवायचे, कोण कोंबड्या चोरायचे, कोण चुना लावायचे. आमची सर्व ताकद शिवसेना या चार अक्षरात आहे.

आम्ही गर्जना करायला नाही गर्जना ऐकायला आलोय. महाराष्ट्राच्या घराघरांत एकच गर्जना आहे. निवडणुका येऊ द्या मग दाखवतो. आमची सत्ता येऊ द्या. ज्यांनी निकाल दिला त्याला चुना लावायला पाठवू. मी निर्भीडपणे बोलतो. परिणामांची काळजी करत नाही, असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News