Indian Banks Association : जर तुम्ही बँक कर्मचारी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण बँक कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होऊ शकते.
त्यानुसार बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याची सुविधा लवकरच लागू केली जाऊ शकते. याबाबत इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइज यांच्यात एक करार झाला आहे. मात्र एका महिन्यात दोन सुट्या वाढल्याने बँक कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ होणार आहे.

दररोज 40 मिनिटे अधिक काम करावे लागणार
नव्या करारानुसार बँक कर्मचाऱ्यांना दररोज 40 मिनिटे अधिक काम करावे लागणार आहे. रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. मात्र आता येत्या काळात प्रत्येक शनिवार आणि रविवारी बँका बंद राहणार आहेत.
याबाबत लवकरच नवीन व्यवस्था सुरू होऊ शकते. याबाबत संघटनेने संमती दिली आहे. बँक युनियन अनेक दिवसांपासून पाच दिवस काम करण्याची मागणी करत आहेत.
गेल्या वर्षी एलआयसीमध्ये पाच दिवसांचा आठवडा
2022 साली LIC मध्ये स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होण्याच्या पाच दिवस आधी केले गेले होते. यानंतर बँक संघटनांकडून पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
ऑल इंडिया बँक ऑफिसर्सचे सरचिटणीस एस नागराजन यांनी सांगितले की, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम 25 अंतर्गत सरकारला सर्व शनिवार सुटी म्हणून घोषित करावे लागतील.
अहवालानुसार, कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.30 पर्यंत 40 मिनिटे अधिक काम करावे लागेल. हा प्रस्ताव आयबीएने मान्य केल्याचेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
बहुतांश ग्राहक मोबाईल बँकिंग, एटीएम आणि इंटरनेट बँकिंग सुविधा वापरत असल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु तरीही काही ग्राहक बँकेत जाणून त्यांचे काम करून घेत असतात.