Railway Rule : भारतीय रेल्वेने दिवसभर लाखो लोक प्रवास करत असतात. रेल्वेचे खूप मोठे जाळे देशभरात पसरले आहे. मात्र तुम्हाला रेल्वेचे काही नियम माहिती नसतील. रेल्वेच्या डब्यांवर अनेकदा तुम्ही पिवळ्या रेषा पहिल्या असतील मात्र यामागील कारण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?
रेल्वे डब्यावरील पिवळ्या रेषा तुम्हाला अनेकदा वाटत असेल की ते आकर्षक दिसावे यासाठी मारल्या जात असतील. मात्र यामागे एक वेगळेच कारण आहे. त्या रेषा एका वेगळ्या कारणासाठी मारलेल्या असतात.
भारतीय रेल्वेचा प्रवास हा खूप आरामदायी मानला जातो. अनेकजण लांब पल्ल्याचा प्रवास रेल्वेनेच करत असतात. मात्र रेल्वेचे काही नियम अनेकांना माहिती नसतात ते जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
रेल्वे डब्बा
रेल्वेमध्ये अनेक डबे असतात. या डब्यांवर अनेक प्रकारची माहिती दिलेली असते. मात्र काही वेळा डब्यांवर फक्त वेगवेगळ्या रंगाच्या रेषा दिलेल्या असतात. तसेच काही चिन्हे देखील असतात. आज तुम्हाला डब्यांवरील पिवळ्या रेषा कशासाठी असतात याबद्दल सांगणार आहोत.
रेल्वेने प्रवास करत असतात त्याच्या वेळेवर अधिक लक्ष देत असतो. प्रत्येक डब्यावर वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या असतात. त्या पट्ट्यांचा अर्थही वेगवेगळा असतो. जास्त करून तुम्हाला पिवळ्या रंगाच्या अधिक पट्ट्या पाहायला मिळतील.
रेल्वे डब्यावरील पिवळ्या पट्ट्या
या पट्ट्यांविषयी प्रवाशांना कमी माहिती आहे. आपल्यापैकी बर्याच जणांना या पिवळ्या पट्ट्यांचे ट्रेनच्या कंपार्टमेंट्सवरील अर्थ माहित नाही. रेल्वेच्या निळ्या आणि लाल डब्यावर रुंद पिवळ्या रंगाचे पट्टे रंगविले जातात. जे दर्शविते की शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवाश्यांसाठी डबा तयार करण्यात आला आहे. हे आजारी असलेल्या प्रवाश्यांसाठी देखील आहे.