Ajit Pawar : आता माझी स्थिती थोडी खुशी थोडी गम! चिंचवड हातातून जात असताना अजित पवारांचे वक्तव्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ajit Pawar : आज पुण्यातील पोट निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तसेच चिंचवडमध्ये भाजपच्या आश्विनी जगताप आघाडीवर आणि विजयाच्या जवळ आहेत. यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीला एका एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे.

असे असताना आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, माझी स्थिती आता थोडी खुशी थोडी गम अशी झाली आहे. कसबा गेली 25 वर्ष भाजपकडे होता. त्याठिकाणी आम्ही विजय मिळवला.

असे असताना आमचेच दोन्ही उमेदवार उभे राहिल्याने चिंचवडमध्ये आम्हाला पराभव दिसत आहे. सध्या चिंचवडमध्ये १८ व्या फेरीत जगताप यांना ६४०४९ मते, महाविकास आघाडीचे नाना काटे यांना ४९९०७, तर अपक्ष राहुल कलाटे यांना २०६१० मते मिळाली आहेत.

यावेळी जगताप तब्बल ११ हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. यानंतर मताधिक्य वाढेल असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. यामुळे ही जागा जवळपास राष्ट्रवादीसाठी गेल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि काँग्रेसचे नाना काटे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी शंकर आण्णा गावडे कामगार भवनमध्ये सुरु झाली आहे. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत.