Fake App Alert : तुमच्याही स्मार्टफोनमध्ये असेल ‘हे’ अ‍ॅप तर लगेचच डिलीट करा, तुमच्या बँक खात्याला आहे धोका

Published on -

Fake App Alert : सध्या जवळपास सर्व व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. व्यवहार ऑनलाइन होत असल्यापासून फसवणुकीचे प्रकारात वाढ झाली आहे. हॅकर्स अनेक मार्गांनी यूजर्सकडून त्यांची खासगी माहिती काढून घेतात आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे पैसे गायब करतात.

त्यामुळे सुरक्षेच्या दुष्टीने फेक अ‍ॅप्स डाउनलोड करणे टाळा. सरकार याबाबत सतत इशारा देत असते. तरीही काही युजर्स हे फेक अ‍ॅप्स डाउनलोड करतात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे फेक अ‍ॅप्स तंतुमच्या स्मार्टफोन तसेच बँक खात्यासाठी खूप हानिकारक आहे.

लिंकद्वारे अ‍ॅप डाउनलोड करणे टाळा

अनेकजण अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी थर्ड पार्टी लिंक किंवा WhatsApp वर मिळालेल्या लिंक्सचा वापर करतात. मात्र हे अ‍ॅप्स बनावट असण्याची शक्यता असते. हे तुमची बँकिंग माहिती चोरून तुमची फसवणूक करण्याचे काम करतात. त्यामुळे प्ले स्टोअरवरूनच अ‍ॅप डाउनलोड करावे.

पुनरावलोकनाकडे दुर्लक्ष करू नका

जेव्हा तुम्ही एखादे अ‍ॅप डाउनलोड करता तेव्हा तुम्ही त्याच्या पुनरावलोकनाकडे दुर्लक्ष करू नका. कारण अॅपमध्ये काही चूक असेल किंवा ते खोटे असेल तर लोक रेटिंग आणि कमेंट्स करून सांगतात. जर तुम्हाला कोणतीही कमेंट चुकीची वाटली तर अ‍ॅप डाउनलोड करू नका.

लवकर बॅटरी संपते

जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एक अ‍ॅप डाऊनलोड केले त्यानंतर तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत आहे, तर तुम्ही हे अ‍ॅप ताबडतोब डिलीट करा. कारण असे अ‍ॅप बनावट असू शकतात, जे तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.

चुकीची स्पेलिंग

जर तुम्ही एखादे अ‍ॅप डाउनलोड करत असल्यास तुम्हाला नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक दिसली तर हे अ‍ॅप बनावट असू शकते हे लक्षात घ्या. या प्रकारच्या अ‍ॅपमध्ये अ‍ॅपचे नाव चुकीच्या स्पेलिंगसह लिहिलेले असले तरी ते बघायला किंवा वाचायला छान दिसते.

कटाक्षाने टाळावे थर्ड पार्टी अ‍ॅप्स

अनेकजण थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर करत असतात. जसे- बँकिंग अ‍ॅप. खरं तर, अशी अ‍ॅप्स पहिल्यांदा तुम्हाला तुमची बँकिंग माहिती तसेच तुमच्या मोबाईलचे सर्व अधिकार विचारतात. परंतु, हे अ‍ॅप तुमचे खाते रिकामे करू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe