Udayanraje : सातारचे खासदार उदयनराजे यांचा अंदाजच वेगळा आहे. यामुळे त्यांची अफाट लोकप्रियता आहे. यामुळे ते सारखेच चर्चेत असतात. साताऱ्यात उदयनराजे हे विविध भूमिपूजनाच्या कार्यक्रमांसाठी आलेले होते. त्यावेळी शाळेत जाण्याऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष त्यांच्यावर पडले आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्यांनी वाटेतच रिक्षा थांबवली.
यावेळी उदयनराजेंनेही मोठ्या उत्साहाने त्यांच्यासोबत फोटो काढून घेतला. अनेकांना असा प्रत्यय साताऱ्यात येतो. त्यांची कॉलर उडवण्याची तसेच कला करण्याची पद्धतच वेगळी आहे. साताऱ्यात प्रत्येक व्यक्ती उदयनराजेंना मानते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तरुणाईची अक्षरक्ष: वाट्टेल ते करायला तयार असते.
आज ही असाच एक प्रकार पाहायला मिळाला. उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस नुकताच झाला. मात्र, त्यांचा फिव्हर काही कमी होत नाही. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
कराड येथील हजारमाची येथे बैलगाडा शर्यत संपन्न झाली. त्यावेळी उदयनराजे उपस्थित होते. त्यावेळी हजारो कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्या भोवताली होता. दरम्यान, सकाळी रिक्षातून शाळेकडे निघालेल्या विद्यार्थ्यांनी रिक्षा थांबवून उदयनराजेंसोबत फोटोसेशन केले.
छत्रपती उदयनराजे भोसले यांची फॅन फॉलोईन खूप मोठी आहे, त्यांच्या चाहत्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच तरुणांमध्येही त्यांची मोठी क्रेझ आहे. महाराष्ट्राभरात उदयनराजेंचे अनेक चाहते आहेत.