PM Kisan : केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षातून ६ हजार रुपये दिले जातात. केंद्र सरकारकडून २७ फेब्रुवारी रोजी १३वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे.
मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही १३व्या हफ्त्याचे पैसे जमा झाले नाहीत. जर तुमच्याही खात्यात १३व्या हफ्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर काही हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहेत त्यावर कॉल करून तुम्ही पैसे मिळवू शकता.
होळीच्या १० दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात १३व्या हफ्त्याचे पैसे जमा केले आहेत. ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 16,400 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे.
जर अद्यापही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तुम्ही तक्रार नोंदवू शकता. हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमची समस्या सांगू शकता. सोमवार ते शुक्रवार या दिवसांत तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.
13व्या हप्त्याबाबत तुम्हाला काही प्रश्न किंवा तक्रार असल्यास, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही तुमची तक्रार ईमेल आयडी [email protected] वर मेल करू शकता.
या प्रकारे पहा पैसे जमा झाले आहेत की नाही?
सर्वप्रथम तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही ते तपासा.
यासाठी सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.
वेबसाइटवर दिलेल्या ‘फार्मर्स कॉर्नर’ टॅबवर क्लिक करा.
यानंतर ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा.
येथे एक नवीन पृष्ठ उघडेल. यानंतर, तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांकाचा पर्याय निवडा.
पर्याय निवडल्यानंतर तपशील भरा.
‘डेटा मिळवा’ वर क्लिक केल्यावर हप्त्याची स्थिती दिसेल.
इथून तुम्हाला पैसे मिळाले की नाही हे कळेल.
पीएम किसान योजना काय आहे?
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षातून ३ हफ्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जातात. ही योजना २०१९ मध्ये सुरु करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि त्यांना शेतीला आर्थिक हातभार लागावा यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना 2.25 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे.