Gold Update : सोन्याबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, आता सोने खरेदी करणे होणार सोप्पे…

Ahmednagarlive24 office
Published:

Gold Update : सध्या देशात लग्नसराई सुरू आहे. यामुळे सोनं, दागिन्यांची खरेदी-विक्रीही चांगलीच जोरात चालली आहे. अशा वेळी ही बातमी सर्वांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे.

कारण सोन्याच्या संदर्भात केंद्र सरकारने एक नवा नियम बनवला आहे. या नवीन नियमानुसारच आता सोन्याची खरेदी-विक्री होईल. अन्यथा आपल सोनं ग्राह्यच धरण्यात येणार नाही.

आता सरकारच्या नवीन नियमानुसार सोनं आणि सोन्याच्या दागिने 6 डिजीट अल्फान्युमेरिक HUID हॉलमार्क असल्याशिवाय सोन्याची विक्री करताच येणार नाही. म्हणजे असं सोनं इथूनपुढ ग्राह्य धरलं जाणार नाही. 1 एप्रिल 2023 पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे.

सोन्यावरील असणारी हॉलमार्किंग हा सोन्याची शुद्धता ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. हॉलमार्क वर भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी आकाराचे चिन्ह आहे. त्याचबरोबर हॉलमार्किंग केंद्राच्या लोगो बरोबरच सोन्याची शुद्धता सुध्दा लिहिलेली आहे.

आपल्याला सोन्याची शुद्धता ओळखायची असेल तर त्यासाठी सरकारने एक नवीन अॅप बनवले आहे. ‘BIS Care या नावाच्या App’द्वारे ग्राहक सोन्याची असणारी शुद्धता तपासू शकतात.

या अॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्या सोन्यासंबंधी कोणतीही तक्रार नोंदवू शकता. या एप्लिकेशन्स चा परवाना, नोंदणी तसेच हॉलमार्क क्रमांक चुकीचा दिसून आल्यास ग्राहक त्या संदर्भात तत्काळ तक्रार करू शकतात.

दरम्यान, सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली आणि महत्त्वाची बातमी आहे. सध्या सोने 2700 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 15800 रुपये किलोने स्वस्त होत आहे. सध्या सोने 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 64,000 रुपये प्रति किलो या दराने विकली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe