Use Of Car Sunroof : कारमध्ये उभे राहण्यासाठी नाही तर या कारणांसाठी दिले जाते सनरूफ! कारणे जाणून व्हाल चकित

Use Of Car Sunroof : आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्या कारमध्ये सनरूफ देत आहेत. तसेच ग्राहकही सनरूफ असलेल्या कारकडे चांगलेच आकर्षित होत आहेत. पण कारमध्ये सनरूफ हे वेगळ्याच कारणांसाठी दिले जाते. मात्र सनरूफचा काही लोक चुकीचा वापर करत आहेत.

सनरूफ असलेल्या कार खरेदीसाठी ग्राहकही पहिली पसंती देत आहेत. अनेकदा तुम्हीही रस्त्याने येता जाता सनरूफमधून बाहेर येऊन फोटो किंवा व्हिडीओ काढत असलेले लोक पहिले असतील किंवा तुम्हीही अनेकदा असे केले असेल.

पण तुम्हाला माहिती नसेल की चालत्या कारमधून बाहेर पडणे हे धोकादायक ठरू शकते. तसेच कंपनीकडून सनरूफ कारमधून बाहेर येण्यासाठी नाही तर वेगळ्या कारणासाठी दिले जाते. सनरूफ कशासाठी दिले जाते? त्यामागची करणे काय आहेत? याबद्दल जाणून घेऊया…

नैसर्गिक प्रकाश

कंपनीकडून कारमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश यावा यासाठी सनरूफ दिले जाते. कारमध्ये अनेकदा खिडकीच्या काचेतून जास्त सुर्प्रकाश येत नाही. पण सनरूफ उघडल्यास अधिक सूर्यप्रकाश आणि हवा येते.

वेंटिलेशन

सनरूफच्या मदतीने कारची केबिन लवकरात लवकर थंड होते. उन्हाळ्यात सनरूफचा सर्वात जास्त उपयोग होत असतो. उन्हाळ्यात कार जास्त वेळ एका जागी उभी केली तर ती जास्त गरम होते. पण सनरूफ उघडले की कार लगेचच थंड होते.

आपातकालीन मार्ग

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सनरूफचा वापर आपत्कालीन एक्झिट गेट म्हणून केला जाऊ शकतो आणि आपण कारमधून बाहेर पडू शकता. जर अशी परिस्थिती उद्भवली की कारचे दरवाजे उघडत नाहीत, तर तुम्ही सनरूफ उघडण्याचा प्रयत्न करू शकता. सनरूफ उघडल्यास, तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe