PPF Scheme Latest Update : पीपीएफ योजनेतील गुंतवणूकदारांची लागली लॉटरी! सरकार देणार 42 लाख रुपये

Ahilyanagarlive24 office
Published:

PPF Scheme Latest Update : पीपीएफ योजनेतील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून आता याक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना ४२ लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची लॉटरी लागली आहे.

नोकरी करत असताना पीपीएफ योजनेत पैसे गुंतवणे हा एक चांगला मार्ग आहे. कारण या योजनेत पैसे गुंतवून तुम्ही टॅक्स देखील वाचू शकता. या योजनेत एका वर्षात किमान ५०० ते कमाल १.५ लाख रुपये गुंतवू शकता. या गुंतवलेल्या पैशावर ७.१ टक्के व्याजदरही दिले जाते.

पीपीएफ योजनेमध्ये पैसे गुंतवणे हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. कारण या योजनेत पैसे गुंतवण्यास कोणतीही जोखीम नाही. तसेच सरकारकडून तुमच्या पैशाची हमी देखील घेतली जाते.

दीर्घकालीन सर्वोत्तम पर्याय

पीपीएफ योजनेत तुम्ही दीर्घकाळ पैसे गुंतवू शकता. या योजनेत एका वर्षात १.५ लाख रुपये गुंतवू शकता. या योजनेतील गुंतवलेल्या पैशावर चक्रवाढ व्याज सुविधा देखील उपलब्ध आहे. दीर्घकाळ पैसे गुंतवल्यास तुम्हाला फायदाही चांगला होतो.

42 लाख रुपये कसे मिळवायचे

तुम्ही पीपीएफ योजनेत दरमहा ५००० रुपये गुंतवल्यास संपूर्ण वर्षासाठी तुमची गुंतवणूक 60,000 रुपये होईल. जर तुम्ही ते 15 वर्षांसाठी गुंतवले, तर मॅच्युरिटीवर तुमचे पैसे 16,27,284 रुपये होतील.

जर तुम्ही 5-5 वर्षांच्या मुदतीत पुढील 10 वर्षांसाठी ठेव वाढवली तर 25 वर्षानंतर तुमचा निधी सुमारे 42 लाख रुपये (41,57,566 रुपये) होईल. यामध्ये तुमचे योगदान 15,12,500 रुपये आणि व्याज उत्पन्न 26,45,066 रुपये असेल.

या योजनेतील गुंतवणुकीची सुरुवात कुठे करू शकता

योजनेत तुम्ही सुरुवातीला ५०० रुपये गुंतवू शकता. तुमची तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून कुठेही पीपीएफ योजनेसाठी खाते उघडू शकता. सरकारकडून गुंतवणुकीवर 1 जानेवारी 2023 पासून 7.1 टक्के दराने व्याजाचा लाभ दिला जात आहे.

तुम्ही कर्जासाठीही अर्ज करू शकता

तुम्हाला पीपीएफ स्कीममध्ये कर सवलतीचा लाभही मिळतो. या योजनेत तुम्ही कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. या योजनेतील व्याजातून मिळणारी रक्कमही करमुक्त आहे. या योजनेत ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कर्जासाठी अर्जही करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe