Devendra Fadnavis : सध्या राज्यात कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. मिळणाऱ्या भावातून वाहतुकीचा खर्चही वसूल होत नाही, अशी परिस्थिती आहे. अनेकांना मोठ्या प्रमाणावर कांदा विकून देखील दोन चार रुपये मिळत आहेत. यामुळे उत्पादन खर्च सोडा वाहतूक खर्च देखील निघत नाही.
त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर अमरावतीत कांदा फेकण्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे काही काळ गोंधळ झाला होता. यावेळी काहींना ताब्यात घेण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ही कृत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान सध्या राज्य सरकारवर रोष निर्माण झाला आहे.
अधिवेशनात देखील हा प्रश्न उपस्थित झाला असून यावर अजूनही ठोस असा उपाय केला गेला नाही. नाफेडकडून कांदा खरेदी सुरू करण्यात येईल, असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले होते.
असे असताना मात्र अजूनही नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झालेली नाही. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार का हे लवकरच समजेल. यामुळे मात्र शेतकरी नाराज झाले आहेत.