Pan-Aadhaar Link : तुमचे पॅन आधारशी लिंक आहे की नाही? आत्ताच जाणून घ्या नाहीतर याल खूप मोठ्या अडचणीत

Ahmednagarlive24 office
Published:

Pan-Aadhaar Link : सध्या काळात पॅन कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. पॅन कार्डचा वापर जास्तीत जास्त आर्थिक कामात केला जातो. जर पॅन कार्डच नसेल तर आर्थिक कामे रखडली जातात. अशातच काही दिवसांपासून पॅन कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करण्यास सांगितले आहे.

सरकारने याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. सरकारने आता पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 ही दिली आहे. या तारखेपूर्वी तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करा. नाहीतर तुम्ही खूप मोठ्या अडचणीत सापडू शकता.

पॅन कार्ड आधाशी लिंक आहे की नाही, घरबसल्या पहा

स्टेप 1

  • आता तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक आहे, नाहीतर ते आर्थिक वर्षापासून निष्क्रिय करण्यात येईल.
  • जर तुम्ही ते आत्ताच लिंक केले असेल तर ठीक आहे. तुम्ही आता तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.
  • यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईट, http://incometax.gov.in वर जावे लागणार आहे.

स्टेप 2

  • या वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला येथे अनेक पर्याय पाहायला मिळतील
  • यामधून तुम्हाला ‘Link Aadhaar Status’ हा पर्याय शोधावा लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप 3

  • तुम्ही हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल.
  • ज्यात आता तुम्हाला ‘View Link Aadhaar Status’ हा पर्याय मिळेल.
  • त्यावर क्लिक करा

स्टेप 4

  • तुम्ही आता ‘View Link Aadhaar Status’ या पर्यायावर क्लिक करताच, तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक झाले आहे की नाही हे समजेल.
  • यासाठी स्क्रीनवर मेसेजद्वारे माहिती मिळते.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe