Night Sleeping Rule in Train : रेल्वेने पुन्हा एकदा जारी केले नवीन नियम, लवकरात लवकर जाणून घ्या नाहीतर होऊ शकते शिक्षा

Published on -

Night Sleeping Rule in Train : देशातील लाखो लोक रेल्वेने ये-जा करत असतात. रेल्वेचा प्रवासही आरामदायी आणि कमी खर्चिक आहे. रेल्वे आपल्या प्रवाशांच्या हितासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते. तसेच काही नियमही जारी करत असते. परंतु, प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना याबद्दल माहिती नसते.

त्यामुळे त्यांना रेल्वेच्या सुविधेचा लाभ घेता येत नाही आणि माहिती नसल्यामुळे चुकून नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळे त्यांना शिक्षा भोगावी लागते. अशातच रेल्वेने पुन्हा एकदा एक नियम जारी केला आहे. प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या नाहीतर संकटात याल.

प्रवाशांना झोपताना त्रास होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने हा नवा नियम लागू केला आहे. प्रवाशांच्या तक्रारींनंतर हे बदल करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी लोक आवाज करत असल्याच्या आणि मोठ्या आवाजात संगीत ऐकत असल्याच्या तक्रारी भारतीय रेल्वे प्रशासनाकडे आल्या होत्या. यात लोकांनी असे सांगितले की 10 वाजल्यानंतरही लोक दिवे लावतात. प्रवासी गट एकत्र बसून मोठ्याने बोलतात आणि गाणी वाजवतात.

काय आहेत नवीन सूचना? जाणून घ्या

नवीन मार्गदर्शक तत्त्वात असे म्हटले आहे की लोकांनी रात्रीच्या प्रवासादरम्यान, मोबाईल फोन किंवा लॅपटॉपवर बोलणे, हसणे, गाणे आणि संगीत ऐकणे यासह ट्रेनमध्ये कोणताही आवाज करू नये. तसेच हे लक्षात घ्या की हा नियम भारतातील सर्व गाड्यांना लागू आहे. जर कोणी या नियमांचे उल्लंघन करताना दोषी सापडला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. इतकेच नाही तर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ते खूप मोठ्या अडचणीत येऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!