Sharad Pawar : देव, धर्म यापासून मी बाजूला असतो! 24 वर्षांनंतर शरद पवार देहूत…

Ahmednagarlive24 office
Published:

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावर आधारित दिनदर्शिका अनावरण सोहळा देहूत आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, देव, धर्म यापासून मी बाजूला असतो. पण माझ्या अंतःकरणात काही ठिकाणं आहेत.

यामध्ये देहू आणि शेगाव यांसारखी काही ठिकाणं आहेत, असेही ते म्हणाले. शरद पवार तब्बल २५ वर्षांनी देहूत आले होते. यावेळी पवार म्हणाले, मी देव-दानव या भानगडीत फारसा पडत नाही. यापासून लांबच असतो. मात्र काही देवस्थानं अशी आहेत, जी माझ्या अंत:करणात वसली आहेत.

त्यापैकी एक म्हणजे शेगाव, आळंदी आणि देहू आहेत. या मंदिरात गेल्यानंतर मला मानसिक समाधान मिळत. देहूला गेल्याशिवाय कोणतही काम पूर्ण होत नसत. जगद्गुरूंची सेवा करण खूप गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ४०० वर्षांपासून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम कोणी केले असेल तर ते नाव म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे आहे.

त्यांनी शब्दांच्या माध्यमातून हे कार्य केलं आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे. यावेळी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. तसेच मोठ्या प्रमाणावर वारकरी देखील उपस्थित होते.

यावेळी देहू संस्थानकडून तुकोबांची मूर्ती, पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन पवार यांचा सत्कार करण्यात आला. माझ्या अंतःकरणात काही ठिकाणं आहेत, त्यातील शेगाव एक आहे. आता ते गृहस्थ सध्या नाहीत, मात्र त्यांचे आणि आमचे घरोब्याचे संबंध आहेत, असेही पवार म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe