Ajit pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं. तेव्हा अनेक काम झाली.
कोरोना आला तेव्हा त्यांनी आम्ही चांगलं काम केलं. आम्ही सत्तेत आल्यानंतर लगेचच कोरोना आला. या कोरोना काळात उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वपूर्ण होती याची नोंद देखील अनेकांनी घेतली. सर्व यंत्रणा उभी करून अनेकांना मदत केली.

लसीकरण, बूस्टर डोस, अॅम्ब्युलन्स यांची योग्य व्यवस्था केली गेली, असं अजित पवार म्हणाले. राज्याचा कारभार देखील व्यवस्थित संभाळला. यामुळे आपल्यावर आलेले मोठे संकट टळले. इतर राज्यात याचा मोठा फटका बसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान, अहमदनगरच्या एका हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. तसेच ते म्हणाले, मी हॉस्पिटलचे उद्घाटन केले आहे. मात्र ढिगाने पेशंट यावेत, अशी माझी अजिबात भावना नाही. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
तसेच आरोग्याच्या चांगल्या सवयी लावा. व्यायाम करा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यांनी देखील कोरोना काळात बाहेर पडून सर्वांना मदत केली होती. तसेच अर्थमंत्री असताना त्यांनी राज्याचा कारभार सक्षमपणे संभाळला.