Cheapest iPhone Sale Scam : आयफोन प्रेमींनो सावधान! स्वस्त आयफोन पडला महागात, मिनिटांत 29 लाखांचा झटका; जाणून घ्या कसे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cheapest iPhone Sale Scam : आजकाल डिजिटल युगामुळे सर्वजण घरबसल्या शॉपिंग करत असतात. तसेच अनेक वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाईट उपलब्ध झाल्या आहे त्यावरून स्मार्टफोन आणि अनेक वस्तू खरेदी करता येऊ लागल्या आहेत.

पण जर तुम्हीही ऑनलाईन वेबसाईटवर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण ऑनलाईन वेबसाइट वरून जर आयफोन खरेदी करत असाल तर तुम्हीही फसवणूक होऊ शकते आणि तुमचे लाखोंचे नुकसान देखील होऊ शकते.

तुम्ही अनेकदा फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही वस्तू खूपच कमी किमतीत मिळत असल्याचे पाहत असाल. त्यामुळे अनेकांना या ठिकाणी ऑनलाईन वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरत नाही.

जर तुम्हीही अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काही वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचीही लाखोंची फसवणूक केली जाऊ शकते. पण तुम्ही विचारात पडला असाल की वस्तू खरेदी केल्याने लाखोंची फसवणूक कशी होऊ शकते. चला तर जाणून घेऊया…

स्वस्त आयफोन पडला लाखोंना

दिल्ली येथील विकास कटियार यांच्यासाठी आयफोन खरेदी करणे खूपच महागाचे ठरले आहे. इन्स्टाग्रामवर स्वस्त आयफोनची ऑफर पाहिल्यानंतर विकासनेही आयफोन खरेदी करण्याचा विचार केला आणि त्यांनी इंस्टाग्राम पेज फेक तर नाही ना यासाठी त्या पेज मालकाला फोन देखील केला.

कॉल केल्यानंतर बँक रिकामी

6 फेब्रुवारी रोजी विकासने प्रथम इन्स्टाग्राम पेजच्या मालकाशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांकावरून कॉल केला. त्यादरम्यान त्याला सांगण्यात आले की स्वस्तात आयफोन खरेदी करायचा असेल तर त्याला 30 टक्के किंमत द्यावी लागेल.

ही रक्कम 28,000 रुपये होती जी विकासने भरली होती. यानंतर विकासला दुसऱ्या क्रमांकावरून फोन आला, ज्यामध्ये त्याला कस्टम क्लिअरन्ससाठी आणखी पैसे द्यावे लागतील, जे नंतर परत केले जातील, असे सांगण्यात आले.

बँक खात्यातून २९ लाख रुपये गायब

आयफोन खरेदीदार विकास याला कॉल आल्यानंतर त्याच्या खात्यातून 28,69,850 रुपये काढण्यात आले. त्यानंतर विकासने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. यांनतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

चुकूनही ही चूक करू नका

फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. म्हणूनच अशा बनावट ऑफरपासून दूर राहा. चुकूनही कोणत्याही ऑनलाईन पेजवर ऑफर दिली असेल तर त्याच्या नदी लागू नका आणि अशा प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास लगेच सायबर पोलिसांकडे तक्रार करा.