Yamaha Hybrid scooter : देशात दिवसेंदिवस इंधनाच्या किमती वाढत चालल्याने ऑटो क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहेत. त्यामुळे ग्राहकांना इंधनापासून मुक्ती मिळत आहेत. तसेच पैशाचीही मोठी बचत होत आहे.
अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बाईक, कार आणि स्कूटर बाजारात लॉन्च झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाहन खरेदीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकही चांगलेच आकर्षित होत आहेत.
आता यामाहा कंपनीकडून हायब्रीड स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता एकाच स्कूटरमध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक असे दोन पर्याय मिळत आहेत. त्यामुळे ग्राहक पेट्रोल आणि इलेक्ट्रिकवर स्कूटर चालवू शकतात.
यामाहा कंपनीने बाजारात नवीनच स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरमध्ये डिझाईन आणि वैशिष्ट्ये देखील जबरदस्त देण्यात आली आहेत. तसेच किंमतही कमी ठेवण्यात आली आहे त्यामुळे ग्राहक ही स्कूटर खरेदी करू शकतात.
ही स्कूटर विशेषत: तरूण आणि कार्यालयीन कामाच्या व्यक्तीसाठी बनवण्यात आली आहे. पण ही स्कूटर सर्वजण खरेदी करू शकतात. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ब्लूटूथ डिव्हाइस कनेक्टिव्हिटी, स्मार्ट डिजिटल ऑटो मीटर स्क्रीन पॅनेल देण्यात आली आहे.
यामाहा कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरच्या दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. तसेच डिझाईन देखील जबरदस्त बनवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकही या स्कूटरला चांगला प्रतिसाद देतील असा कंपनीचा दावा आहे.
किंमत आणि EMI
या हायब्रिड स्कूटरची किंमत 106466 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु कंपनी या स्कूटरवर एक उत्कृष्ट EMI ऑफरची योजना दिली जात आहे. तुम्ही फक्त 15000 रुपयांच्या डाउन पेमेंटसह ही हायब्रीड स्कूटर घरी आणू शकता.
तुम्हाला उर्वरित पैसे EMI म्हणून मासिक 2938 रुपयांच्या दराने भरावे लागतील. तुम्ही स्कूटर घेण्यासाठी घेतलेल्या कर्जावर फायनान्स कंपनी 9.7 टक्के व्याज आकारेल.