women’s day : ‘मुख्यमंत्रिपदी ज्या दिवशी महिला असेन तोच खरा महिला दिन’

Published on -

women’s day : काल देशात सर्वत्र महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांनी महिलांबाबत अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विधानसभेत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन जवळपास ६३ वर्ष पूर्ण झाली. पण सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही मुख्यमंत्रिपदी महिला बसलेली नाही. खातेवाटप होताना महिलांना दुय्यम दर्जाची खाती दिली जातात.

पण महिलांना अर्थ, नगरविकास, महसूल अशी खाती ज्यादिवशी दिली जातील किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी ज्यादिवशी महिला असेल तोच खरा महिलादिन, असेही त्यांनी म्हटले आहे. शासन म्हणून महिला विकासाच्या अनेक योजना, उपक्रम, प्रकल्प राबविण्यात येत आहेत.

असे असताना तरीही महिलांच्या बाबतीतली आर्थिक, समाजिक धोरणंही बदलण्याची गरज काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बोलून दाखवली. जागतिक महिला दिनानिमित्त महिला आमदारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

तसेच विधानसभा कामकाजात महिला लोकप्रतिनिधींना प्राधान्य देण्यात आले असून त्यानुसार आजच्या कामकाज पत्रिकेत सर्वपक्षीय महिला आमदारांच्या लक्षवेधी सूचना चर्चेला ठेवण्यात आल्या आहेत. महिला समान हक्क मागतायेत.

फुल भी हैं और चिंगारी भी हैं. हम भारत की नारी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात हक्क आम्हाला मिळत नसतील तर महिला दिन साजरा करुन काय उपयोग आहे? असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe