PPF Update : पीपीएफ खातेधारकांनो…! सरकारने पुन्हा केला मोठा बदल, आत्ताच जाणून घ्या नाहीतर..

Pragati
Published:

 

PPF Update : आता प्रत्येक पीपीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेकजण परतावा जास्त असल्यामुळे या योजनेत गुंतवणूक करतात. इतकेच नाही तर या योजनेत गुंतवणूकदारांना कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. या योजनेतील गुंतवणुकीवर कर लाभही देण्यात येतो.

सरकार सतत या योजनेत बदल करत असते. अशातच आता केंद्र सरकारने PPF च्या नियमात मोठा बदल केला आहे. जर तुमचे खाते असेल तर लगेच जाणून घ्या नाहीतर तुम्हाला फटका बसू शकतो. PPF योजनांमध्ये काय बदल झाले आहेत ते जाणून घ्या.

थोड्या रकमेतून गुंतवणूक करता येते

सरकारच्या बचत योजनांमधील योजनांचा लाभ तुम्हाला कमी पैशात घेता येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनांमध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात. यामध्ये तुम्ही 1.50 लाखांपर्यंत पैसे जमा करू शकता.सरकारने आता PPF चा व्याजदर 7.10 टक्के इतका केला आहे.

महिन्यातून एकदा पैसे जमा करता येतात

तुम्ही या योजनेत किमान 1 वर्षात 500 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत योजनेत 1 वर्षात जमा केले तर तुम्हाला कर सवलतीचा लाभ दिला जातो. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात दरमहा पैसे जमा करता येतात.

15 वर्षानंतरही खाते चालू राहते

15 वर्षांनंतर त्यातील गुंतवणूक थांबते. परंतु, जर तुम्हाला यामध्ये जास्त गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही 15 वर्षांनंतरही या योजनेत गुंतवणूक करू शकता, परंतु त्यानंतर तुम्हाला 1 वर्षातून एकदाच पैसे काढता येतात.

असे चालू करा खाते

पीपीएफ खाते उघडण्यासाठी तुम्हाला फॉर्म-1 सबमिट करावा लागणार आहे. जर तुम्हाला 15 वर्षानंतरही गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला फॉर्म-4 मध्ये अर्ज करावा लागणार आहे.

असे घ्या कर्ज

तसेच तुम्ही पीपीएफ खात्यावर सहज कर्ज मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या PPF खात्यातील फक्त 25% रक्कम कर्ज मिळते.