खत खरेदीसाठी जात कशासाठी? गदारोळानंतर कृषी विभाग म्हणतो…

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : नवीन पॉश मशिनद्वारे शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करताना आता पैशांबरोबर जात सांगावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच आज विधानसभेत विरोधी पक्षांनी या विषयावरून सरकारला धारेवर धरले. त्यानंतर कृषी विभागातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कृषी विभागाने म्हटले आहे, ही जात नाही तर वर्गवारी आहे. केंद्र सरकारने पॉस मशीनचे नवीन ३.२ सॉफ्टवेअर अपडेट केले आहे,

त्यात वर्गवारी हा घटक आहे. कुणाचीही जात विचारली जात नाही. जात पाहून खत दिले जात असल्याची बातमी खरी नाही. उलट प्रत्येक वर्गवारीला लाभ मिळतो की नाही, हे पाहण्यासाठी केवळ वर्गवारी दिली आहे. जनरल, SC, ST, OBC अशा केवळ वर्गवारी त्यात आहेत.

केवळ असा सर्वांना लाभ मिळावा, हा हेतू आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारने एक पत्र केंद्र सरकारला पाठवून याबाबत समाधानकारक तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe