OLA Electric Scooter : भारतातील सर्वात मोठी आणि एक नंबरची इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी ओलाने आता पुन्हा एकदा नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. स्पेशल होळी एडिशन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीकडून लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीच्या सीईओने नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटो शेअर केला आहे.
त्यांनी सांगितले की ओला कंपनीची स्पेशल होळी एडिशन इलेक्ट्रिक स्कूटर मागणीनुसार बाजारात दाखल केली जाणार आहे. Ola S1 चे हे बाजारातील पहिले रंगीत मॉडेल असणार आहे.
या स्कूटरचे फक्त ५ युनिट मोफत दिले जाणार आहेत. कंपनीने दावा केला आहे की जे यूजर्स होळीवर स्कूटरसोबत सर्वोत्तम फोटो क्लिक करतील त्यांना कंपनीकडून भेटवस्तू देण्यात येईल.
ओला कंपनीकडून अद्याप या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री कधी सुरु होईल आणि त्याची किंमत तसेच ग्राहक कधीपासून खरेदी करू शकतात याबाबत माहिती दिलेली नाही. ओला कंपनीच्या सीईओने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्कूटर केशरी, हिरवा, निळा, पिवळा, गुलाबी आणि लाल असे अनेक रंग दिसत आहेत.
रेंज
ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 181 किमीची रेंज देते. त्यामुळे ग्राहकांचाही भरपूर प्रतिसाद या स्कूटरला मिळत आहे. तसेच या स्कूटरला 115 किमी प्रतितास टॉप स्पीड देण्यात आले आहे.
वैशिष्ट्ये
या स्कूटरमध्ये दमदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. S1 Pro या इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाईन देखील आकर्षक बनवण्यात आले आहे. होळी स्पेशल एडिशन म्हणून ही स्कूटर अनेक रंगामध्ये दिसत आहे. स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट देण्यात आली आहे.
Ola S1 Pro किंमत
Ola S1 Pro दिल्लीमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.05 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 10 रंगांमध्ये उपलब्ध आहे, कोरल ग्लॅम, जेट ब्लॅक, मार्शमेलो, निओ मिंट, पोर्सिलेन व्हाइट, अँथ्रेसाइट ग्रे, लिक्विड सिल्व्हर, मिलेनियल पिंक, मॅट ब्लॅक, मिडनाईट ब्लू.