Praveen Ghule : अहमदनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Published on -

Praveen Ghule : अहमदनगरमधील कर्जत-जामखेडमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

येथील काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रवीण घुले हे कर्जतमधील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये होते.

कर्जत-जामखेडमध्ये प्रवीण घुले यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला त्यांच्या संपर्काचा मोठा फायदा होऊ शकतो. यामुळे आमदार रोहित पवार यांना देखील याचा फटका बसू शकतो. भाजप नेते राम शिंदे यांची काही दिवसांपूर्वी विधान परिषदेवर निवड झाली.

त्यानंतर राज्यातही सत्तापरिवर्तन झाले. त्यानंतर आता भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे येणाऱ्या विधानसभेला रंगत वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी कर्जत-जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे ट्विट भाजप नेते राम शिंदे यांनी केले होते.

त्यानंतर आता फडवीसांच्या उपस्थित काँग्रेससह इतर पक्षातील काही काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा पकड मजबूत करण्यासाठी राम शिंदे प्रयत्न करत आहेत. 2024 ला देखील रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe