Jio Recharge Plan : दिवसेंदिवस सर्व टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन महाग होत चालले आहेत. त्यामुळे ग्राहकांना रिचार्ज करण्यासाठी अधिक पैसे मोजवे लागत आहेत. जर तुम्हीही सतत महाग रिचार्ज करून त्रस्त झाला असाल तर काळजी करू नका कारण आता खूप स्वस्त रिचार्ज प्लॅन आला आहे.
जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कंपनीकडून एक भन्नाट रिचार्ज प्लॅन आणला आहे. त्या रिचार्जचा वापर करून तुम्ही महिन्याला पैशांची बचत करू शकता. अनेक कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन माहगिले आहेत. मात्र जिओ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्वस्त प्लॅन सादर करत आहे.
आता जिओ टेलिकॉम कंपनीकडून आता ३६५ दिवसांच्या प्लॅनची मुदत २३ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. एका रिचार्ज प्लॅनसोबत जवळपास २३ दिवस जास्त मिळणार आहेत.
तुम्हाला हे सर्व फायदे दररोज 8 रुपयांपेक्षा कमी मिळतील
३८८ दिवसांच्या जिओ रिचार्ज प्लॅनची किंमत २९९९ इतकी आहे. जर तुम्ही विचार केला तर दररोज तुम्हाला ८ रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये अनेक सुविधा वापरायला मिळत आहेत. दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग सुविधा, प्रतिदिन 100SMS देखील मिळत आहे.
तसेच जिओच्या ३८८ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनवर JioCinema, JioSecurity, JioCloud, JioTV हे सर्व ॲप मोफत वापरायला मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा दुहेरी फायदा होत आहे.
तुम्ही इतर प्लॅनसह रिचार्ज करू शकता
जर तुम्ही दिवसभर कमी इंटरनेट वापरात असाल तर तुम्हाला महागड्या रिचर्र्जची गरज नाही. कारण जिओचा आणखी एक रिचार्ज प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्हाला ३३६ दिवसांची वैधता देण्यात येते. याची किंमत 2,545 रुपये आहे. यामध्ये प्रतिदिन 1.5GB डेटा आणि इतर सर्व सुविधाही मिळतील.
अमर्यादित 5G सुविधा
टेलिकॉम कंपनी जिओकडून नुकतीच 5G सुविधा सुरु करण्यात आली आहे. जर तुमच्याही शहरात जिओ कंपनीकडून 5G सुविधा सुरु केली असेल तर तुम्ही या सुविधेचा मोफत लाभ घेऊ शकता.