New Ration Card : नवीन रेशनकार्ड बनवायचे आहे? तर या सोप्या पद्धतीने नवीन रेशनकार्डसाठी करा अर्ज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Ration Card : केंद्र सरकारकडून देशातील गरीब नागरिकांसाठी रेशनकार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेतून गरीब नागरिकांना कमी किमतीमध्ये गहू, तांदूळ आणि इतर वस्तू दिल्या जातात. आता सरकारकडून रेशनकार्ड धारकांची यादी जाहीर केली आहे.

केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. त्याचा करोडो नागरिकांना फायदा होत आहे. शेतकऱ्यांसाठी देखील केंद्र सरकार अनेक योजना राबवून शेती क्षेत्राला चालना देत आहे. तसेच आता रेशनकार्डद्वारे देखील नागरिकांना अनेक सुविधा दिल्या जात आहेत.

कोरोना काळापासून केंद्र सरकारकडून देशातील शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच देशाच्या अर्थसंकल्पात भारतमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मोफत धन्य वाटपाची मुदत २०२४ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

रेशनकार्ड हे याक महत्वाचे मानले जाते. अनेक कामासाठी तुम्हाला शिधापत्रिका कागदपत्र म्हणून मागितले जाते. जर रेशनकार्ड नसेल तर तुम्हाला अनेकदा अनेक अडचणींशी सामना करावा लागतो. जर तुमच्याकडेही रेशनकार्ड नसेल तर तुम्हीही अर्ज करू शकता.

भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेत रेशनकार्डधारकांना दैनंदिन वापरातील गहू, तांदूळ, सोयाबीन तेल किंवा रिफाइंड यासारख्या खाद्यपदार्थांचे मोफत वाटप करण्यात आले.

रेशनकार्डच्या नवीन यादीबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत बातमी आलेली नाही, जर तुम्ही तुमचे शिधापत्रिका मिळविण्यासाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

जर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड बनवायचे असेल किंवा नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या सर्व कागदपत्रांची आवश्यकता असेल.

बँक खाते
पत्त्याचा पुरावा
आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर

वरील सर्व कागदपत्रे घेऊन, तुम्ही तुमच्या रेशनकार्डसाठी तुमच्या वॉर्ड प्रमुखाशी किंवा तुम्ही ग्रामीण भागातून आल्यास, तुमच्या ग्रामपंचातीमध्ये संपर्क साधून ऑनलाइन अर्ज करू शकता.