Bachu Kadu : लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, बच्चू कडू यांनी ‘त्या’ प्रकरणावर मागितली माफी…

Published on -

Bachu Kadu : प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी जाहीर माफी मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते वादात सापडले होते. ते म्हणाले, आसाम राज्यातील लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. यामुळे आता हा वाद संपणार का नाही, हे लवकरच समजेल.

नागालँडमधील लोक कुत्रं खातात. आसाम आणि नागालँडमधील दोन्ही राज्य जवळपासच आहेत. त्यामुळे मला वाटलं की, आसाममधीलच लोकं कुत्रे खातात. त्यामुळे ते चुकून नागालँड ऐवजी आसाम असं मी बोलून गेल्याचे देखील ते म्हणाले.

ते म्हणाले, नागालँड बोलायला पाहिजे होतं. एवढीच त्यात माझी चूक आहे, असं बच्चू कडू म्हणाले. यामुळे त्यांनी आता या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत भटक्या कुत्र्यांवर सुरु असलेल्या चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्याचे थेट आसामच्या विधीमंडळात पडसाद उमटले होते.

त्यामुळे आसामच्या राज्यपालांना अवघ्या 15 मिनिटांमध्ये अभिभाषण आवरावं लागलं. राज्याच्या विधानसभेत भटक्या कुत्र्यांवर चर्चा सुरु असताना बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील भटके कुत्रे आसामला पाठवावेत. कारण तेथील लोक भटक्या कुत्र्याचं मांस खातात. त्यामुळे आसाममध्ये भटक्या कुत्र्यांना मोठी मागणी आहे.

याचा विचार करून महाराष्ट्र सरकारने आसाममधील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून महाराष्ट्रातील भटके कुत्रे आसामला पाठवावेत, अशी मागणी केली होती. यानंतर आता बच्चू कडू यांच्या विधानाचे थेट आसामच्या विधीमंडळात पडसाद उमटले होते. अखेर त्यांनी माफी मागितली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe