Gautami Patil : नादच खुळा! पठ्ठ्याने बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलला दिली सुपारी, सातारमध्ये झालं सेलिब्रेशन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gautami Patil : राज्यात सध्या सर्वत्र डान्सर गौतमी पाटीलची जोरदार चर्चा सुरू आहे. तिची एक झलक बघण्यासाठी अनेकजण जीवाचे रान करत आहेत. असे असताना आता सातारमधून एक बातमी समोर आली आहे. आता तर चक्क सातारा जिल्ह्यातील खर्शी, जावली येथील बैलगाडा मालक पैलवान सतीश भोसले यांनी महाराष्ट्र चॅम्पियन अश्विन या बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यामुळे याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच एका पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन सातारा जिल्ह्यातील एका गावामध्ये केले होते. आश्विन या बैलाचा तिसरा वाढदिवस होता. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यंदा तर त्यांनी चक्क गौतमी पाटील हिच्या लावणी नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. सतीश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आश्विन या त्यांच्या शर्यतीच्या बैलावर जीवापाड प्रेम आहे. दरवर्षी ते या बैलाचा वाढदिवस उत्साहात साजरा करतात. यावर्षी त्यांनी चक्क गौतमी पाटीलला बोलावल्याने याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आश्विन नावाचा बैल हा महाराष्ट्र चॅम्पियन असून त्याच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आलं. गौतमी पाटीलला पाहण्यासाठी तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटील सायंकाळी सात वाजता उपस्थित राहिली होती. दरम्यान, गौतमी पाटील ही तिच्या डान्समुळे अनेदा वादात सापडली आहे. त्यावरून तिने अनेकदा माफीही मागितली आहे. मात्र गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांवर त्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. उलट तिच्या कार्यक्रमांना मागणी वाढत गेली.