बजाज ‘या’ तारखेला लाँच करणार जगातील पहिली CNG बाईक ! येत्या एका वर्षात तब्बल ‘इतक्या’ सीएनजी बाईक्स बाजारात येणार, काय म्हणतात राजीव बजाज ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajaj CNG Bikes : गेल्या काही वर्षांमध्ये देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठा वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या अधिकच्या वापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलचे साठे हे मर्यादित आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढत आहे, म्हणून याच्या दरात देखील मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

दरम्यान याच साऱ्या पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक वाहनांना अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जात आहे. दुसरीकडे पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून बाजारात सीएनजी वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे.

आतापर्यंत थ्री व्हीलर, फोर व्हीलर व इतर वाहने सीएनजी प्रकारात पाहायला मिळाली आहेत मात्र लवकरच CNG टू व्हीलर देखील बाजारात लॉन्च होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जगातील पहिली सीएनजी मोटरसायकल बजाज कंपनी तयार करत आहे.

देशातील दिग्गज टू व्हीलर निर्माती कंपनी म्हणून बजाजला ओळखले जात आहे. कंपनी सातत्याने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या बाईक्स लॉन्च करत आहे. अशातच आता बजाज लवकरच सीएनजी मोटरसायकल लाँच करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार 18 जून 2024 ला बजाज कंपनी आपली पहिली सीएनजी मोटरसायकल बाजारात लॉन्च करणार आहे. आगामी बजाज सीएनजी मोटारसायकलमुळे ग्राहकांना कमी खर्चात जास्त अंतर कापता येणार आहे.

दरम्यान, कंपनी पुढील वर्षभरात 5 ते 6 नवीन CNG मोटारसायकली बाजारात लाँच करणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनीच असा दावा केला आहे. एकंदरीत आगामी काळात ग्राहकांना आता सीएनजीवर चालणाऱ्या बाईक्स देखील उपलब्ध होणार आहेत.

पेट्रोलवरील वाढत असलेला खर्च पाहता मध्यमवर्गीयांच्या माध्यमातून या सीएनजी मोटरसायकलला पसंती दाखवली जाऊ शकते असा आशावाद कंपनीला आहे. दरम्यान आता आपण या अपकमिंग सीएनजी बाईकच्या विशेषता नेमक्या कशा आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कशी राहणार जगातील पहिली सीएनजी बाईक 

मीडिया रिपोर्टनुसार, या नव्याने लाँच होणाऱ्या सीएनजी बाइकमध्ये एक मोठी इंधन टाकी राहणार आहे जी दुहेरी इंधन प्रणालीकडे निर्देशित करते. आगामी बाईकमध्ये 100 ते 125cc इंजिन असण्याची शक्यता आहे.

याव्यतिरिक्त, ग्राहकांना आगामी CNG मोटरसायकलमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मागील बाजूस मोनोशॉक डिस्क आणि ड्रम ब्रेक सेटअप मिळू शकतो. दुसरीकडे, सुरक्षिततेसाठी, आगामी बाईक सिंगल चॅनेल एबीएस किंवा कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टमसह प्रदान केली जाऊ शकते.

ही CNG मोटरसायकल भारतात चाचणी दरम्यान अनेक वेळा पाहिली गेली आहे. दरम्यान आता पुढल्या महिन्यात ही बाईक कंपनीच्या माध्यमातून अधिकृतरीत्या लॉन्च केली जाणार असून गेल्या अनेक दिवसांपासून ज्या सीएनजी बाईकची आतुरतेने वाट पाहिली जात होती ती आता ग्राहकांच्या भेटीस येणार आहे.